आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमच्या शटरमध्ये अंगठा अडकवून पैसे लाटणारी टोळी; सर्व आरोपी उच्‍च शिक्षित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर- एटीएमच्या शटरमध्ये अंगठा अडकवून व्यवहार फेल केल्यानंतर बँकेकडे जाऊन पैशाची मागणी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनी शहरात अशा प्रकारच्या तीन घटना केल्या असून त्यातून ६९ हजार रुपये काढल्याची कबुली दिली आहे. तथापि, या भामट्यांनी अनेक ठिकाणी असे प्रकार केले असण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ३० एटीएम कार्ड जप्त केले आहेत. आरोपींनी सांगितले, कानपूर येथे जाऊन एटीएममधून पैसे काढण्याचा व्यवहार कसा फेल करावा, याचे प्रशिक्षण आम्ही घेतले हाेते. यासाठी १ लाख रुपये फी दिली होती. त्यानंतर अशा प्रकारच्या घटना केल्या आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी या टोळीच्या सदस्यांना पकडण्यासाठी ५ हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे.   


पोलिस अधीक्षक डॉ. आशिष यांनी सांगितले, शहरातील काही बँकांकडून एटीएममधून रुपये गायब होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. रुपये गायब कसे होतात? याबद्दल एटीएममध्ये पैसे भरणा करणारी कंपनीही सांगू शकली नाही. कंपनीचे कर्मचारी एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी जात तेव्हा पैसे मोजताना फरक लागत होता. परंतु फारसा  फरक नसल्याने कोणाचे याकडे लक्ष दिले नाही. परंतु अनेकदा असा प्रकार घडून आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

 

यादरम्यान, झाशी रस्ता पोलिस ठाण्याचे फौजदार पंकज तिवारी यांना रामनाथ महाविद्यालयाच्या बाहेर दोन तरुण उभे असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडे अनेक एटीएम कार्ड होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एकाचे नाव अाशिष यादव (रा. सिमथरा भांडेर गाव) आणि दुसऱ्याचे सोनप्रकाश साहू (रा. देवकली, कालपी, जालोन (उत्तर प्रदेश) असे सांगितले. दोन्ही तरुणांची चौकशी केली असता एटीएमचा व्यवहार फेल करून बँकेकडे पैशाचा दावा करणाऱ्या टोळीचा उलगडा झाला.  


जालोन येथे परिचय, मित्रांचे एटीएम तयार केले  
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आशिष यादव याने सांगितले, जालोन येथे त्याच्या मामाचे घर आहे. तेथे त्याची ओळख सोनप्रकाश याच्याशी झाली. सोनप्रकाश याचे काही मित्र एटीएम व्यवहार कसा फेल करावा व बँकेकडे क्लेम करण्याची युक्ती त्यांना अवगत होती.  दोन वर्षांपूर्वी मित्रांनी त्यांना कानपूरला नेले. तेथे एक लाख रुपये फी देऊन या गुन्ह्याचे तंत्र शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी कारवाया सुरू केल्या. दोघांनी त्यांच्या काही मित्रांना व काही गरीब  लोकांना पैशाची लालूच दाखवून बँकेत खाते काढावयास लावले. त्यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवून घेतले. 


सोनप्रकाशने सांगितले, या एटीएम कार्डाने एटीएममधून पैसे काढले जात होते. रुपये काढताना एटीएमच्या शटरमध्ये अंगठा अडकवत असत. त्यातील एक -दोन नोटा एटीएममध्ये परत टाकून देत असत. मशीनवर ट्रँझॅक्शन फेल असा संदेश येत होता. त्यानंतर हे भामटे ऑनलाइन तक्रार करून बँकेत पैशाचा दावा करत असत.  

 

पथकाला बक्षीस 
पोलिस अधीक्षक डॉ. आशिष यांनी या भामट्यांना पकडणाऱ्या पोलिस पथकास ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.  

 

सोनप्रकाश साहू 

जालोनचा रहिवासी. अलाहाबाद विद्यापीठातून इतिहासात पदव्युत्तर परीक्षा उतीर्ण. अलाहाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. (निळे जाकीट)  


अाशिष यादव 

भांडेरचा आहे. मथुरा येथील पी. के. पॉलिटेक्निक सिव्हिल शाखेची पदविका. स्पर्धा परीक्षेची तयारी. पोलिस भरतीसाठी शिकवणी लावली आहे. (लाल जाकीट)  

बातम्या आणखी आहेत...