आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींचा अपमान का केला असे म्हणत, पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात माथेफिरुचा संतावर हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- राष्ट्रपती कोविंद 14 मे रोजी पुष्करला आले होते. त्यांच्या पत्नीला गुडघ्याचा त्रास असल्याने त्यांनी पायऱ्यांवरच पुजा केली होती. 

- या प्रकारानंतर काही असामाजिक तत्वांकडून राष्ट्रपतींचा अपमान करण्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली होती. 

 

पुष्कर - येथील ब्रह्मा मंदिरात सोमवारी दुपारी 3:15 वाजता आश्चर्यकारक घटना घडली. संपूर्ण सुरक्षा     व्यवस्थेचे तीन तेरा वाजवत एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन मंदिरात घुसला. त्या व्यक्तीने संत महादेव पुरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांनी मोठ्या धीराने या प्रसंगाला सामोरे जात स्वतःचा जीव वाचवला. या सर्व प्रकारात त्यांच्या हाताला जखमही झाली. हल्लेखोर सुमारे दोन मिनिटे शस्त्र घेऊन फिरत होता. दर्शनाला आलेल्या भाविकांना तो घाबरवत होता. याच गोंधळात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यालाल पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्लेखोर सोजत अशोक मेघवाल असून तो स्वतः एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगत आहे. अशोकने संत महादेव पुरी यांना आधी प्रसाद दिला आणि नंतर तलवार काढत हल्ला केला. 


हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी केली रेकी 
पोलिसांनी आरोपीवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करत अशोकला अटक केली आहे. आसपासच्या लोकांनी सांगितले की, हल्लेखोर दोन दिवसांपूर्वीदेखिल मंदिरात आळा होता. तो बराचवेळ मंदिराबाहेर बसलेला होता. 


सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं 
ब्रह्मा मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे याठिकाणी चोख सुरक्षाव्यवस्था असते. मंदिरात खासगी सुरक्षा रक्षकही आहेत. मेटल डिटेक्टरने तपासणीही होते. असे असतानाही हा व्यक्ती शस्त्र घेऊन कसा आला हा प्रश्न आहे. 

 

हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल 
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले हाही एक मोठा प्रश्न आहे. याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचे कारण म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ऑपरेटिंग रूमलाही पोलिस सुरक्षा आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...