आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी चिकन खाऊन नृसिंह मंदिरात गेले होते : माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - राहुल गांधींच्या कर्नाटक दौऱ्याच्या सुरुवातीलाच भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी त्यांना निवडणुकीपुरते हिंदू संबोधले होते. आता ट्विट करून म्हणाले की, राहुल 11 फेब्रुवारी रोजी ज्वारीची भाकर - चिकन खाऊन कनागिरीमध्ये नृसिंह स्वामींच्या दर्शनाला गेले. काँग्रेस प्रत्येक वेळी हिंदूंच्या भावनांचा अनादर करण्याचे काम करत आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या आपल्या ट्विटमध्ये येदियुरप्पा यांनी कन्नड भाषेतील टॅब्लॉइड शूधिमुलामध्ये छापलेल्या वृत्ताचा हवाला दिला आहे. प्रदेश काँग्रेसने याला बकवास असल्याचे म्हटले आहे.

 

आमदारांच्या मूर्तीवरही विवाद...
- अपक्ष आमदार बी. नागेंद्र यांनी राहुल गांधींना दिलेल्या महर्षि वाल्मीकींच्या मूर्तीवरही वाद होत आहे. चांदीची ही मूर्ती 10 फेब्रुवारी रोजी देण्यात आली होती.
- भाजपचे म्हणणे आहे की, चांदीचा भाव 40 हजार 600 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मूर्तीचे वचन 157 किलो आहे. या हिशेबाने ही मूर्ती तब्बल 64 लाख रुपये किमतीची आहे.

 

गुजरात निवडणुकीवेळी गाजला होता जानव्याचा मुद्दा...
- गुजरात निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी सोमनाथ मंदिरात गेले होते. तेथील रजिस्टरमध्ये त्यांचे नाव गैरहिंदू म्हणून नोंदवण्यात आले होते. यावर मोठा वाद झाला होता. तेव्हा काँग्रेसने स्पष्ट केले होते की, राहुल हे फक्त हिंदू नाहीत, तर जानवेधारी हिंदू आहेत.
- या वादादरम्यान, भाजप खासदार आणि अभिनेते परेश रावल म्हणाले होते की, मटण खाल्ल्याने उर्दू येत नाही आणि जानवे घातल्याने कोणी हिंदू होत नाही.

बातम्या आणखी आहेत...