आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Baba Hardev Daughter Former Head Of Nirankari Mission Cheated With Digital Signature

बाबा हरदेव निरंकारींच्या मुलीचा आरोप - 'पतीने 2000 कोटींची प्रॉपर्टी हडपली'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलीची प्रॉपर्टी पतीने हडपल्याचा आरोप आहे. - Divya Marathi
निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंह यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलीची प्रॉपर्टी पतीने हडपल्याचा आरोप आहे.

चंदीगड - निरंकारी मिशनचे बाबा हरदेव सिंह यांची ज्येष्ठ कन्या समताने तिचा पती संदीप खिंडा याच्यावर 2000 कोटींपेक्षा जास्त रुपयांनी फसवले असल्याचा आरोप केला आहे. समताचे म्हणणे आहे सी तिच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करुन संदीपने व्यवहार केला. या संबंधी तिने दिल्लीमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाबा हरदेव सिंह याचा 13 मे 2016 रोजी कॅनडामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी संदीप त्यांच्यासोबतच होता. 

 

समताने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की संदीपने जैन फ्लोरीकल्चर लिमिटेड (जेएफएल) नावाची एक कंपनी खरेदी केली आहे. यासाठी त्याने मला कोट्यवधींची गुंतवणूक करण्यास सांगितले. कंपनीमध्ये 100 टक्के शेअर माझे होते. समताचा आरोप आहे की, 'संदीपने तिची बनावट डिजिटल स्वाक्षरी करुन सर्व शेअर्स आपल्या नावे करुन घेतले.' 
- समताने डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी करणारी कंपनी सिफी टेक्नॉलॉजीवरही खटला दाखल केला आहे. समताचे म्हणणे आहे की तिने डिजिटल स्वाक्षरीसाठी कधीही अर्ज केला नव्हता. माझ्या उपरोक्ष कंपनीने डिजिटल स्वाक्षरी तयार केली आहे. 

 

संदीपने बोलावलेली बैठक झालीच नाही
- समताने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की संदीपची आई कृष्णा, वडील बलदेव आणि भाऊ विकेश यांनी एका ईमेल द्वारे कंपनीची तातडीची बैठक बोलावली होती. वास्तविक ही बैठक झालेलीच नाही. या बैठकीला एकाही शेअर होल्डरला निमंत्रित केले नव्हते. 
- संदीने कंपनीचा पत्ता बदलला आहे. एका किरायाच्या घरात त्याने कंपनी सुरु असल्याचे दाखवले आहे. त्याने कपंनीची 2 कोटींची प्रॉपर्टी विकून सर्व पैसा स्वतःच्या नावे केला आहे. 


'वडिलांच्या मृत्यूनंतर माहेरी आले, त्याने सर्व आपल्या नावे केले'
- समताने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आम्ही सोबत असताना मी पती संदीपला माझे सर्व कागदपत्र दिले होते. त्यात माझ्या प्रॉपर्टीचे कागदपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, चेक बुक, एज्यूकेशनल सर्टिफिकेट यांचा समावेश होता. त्याच काळात त्याने माझ्यासोबत दगाबाजी केली. 
- समताने सांगितले, की वडिलांच्या निधनानंतर मी माहेरी गेले होते. सासरी परत आले तेव्हा घरात असलेले पाच लाख रुपये आणि ज्वेलरी गायब झाली होती. त्यानंतर संदीपने मला अंधारात ठेवून एक-एक करत सर्व गुतवणूक, प्रॉपर्टी आणि फॅमिली फंड आपल्या नावे करुन घेतले.

बातम्या आणखी आहेत...