आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • बाबा रामदेवांचे 'हे' अॅप देणार व्हॉट्सअॅपला टक्कर Baba Ramadev Patanjali Launches Kaimbho Mobile App To Counter Whatsapp

बाबा रामदेवांचे 'हे' अॅप देणार व्हॉट्सअॅपला टक्कर, एवढे Amazing आहेत फीचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलि कम्युनिकेशनने एक नवे मॅसेजिंग अॅप किम्भो (Kimbho) लाँच केले. याला व्हॉट्सअॅपचे स्वदेशी व्हर्जन म्हटले जात आहे. पतंजलिचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी दावाही केला आहे की, हे अॅप व्हॉट्सअॅपला टक्कर देईल. तथापि, 3 दिवसांच्या आत टेलिकॉम-तंत्रज्ञान जगतात बाबा रामदेव यांचे हे दुसरे मोठे पाऊल आहे. रविवारीच पतंजलिने स्वदेशी समृद्धी सिम कार्ड लाँच केले होते.

 

किम्भोमध्ये लोकेशन शेअरिंग फीचरही
- Kimbho ला मेसेजिंग, शेअरिंग आणि व्हॉइस कॉल कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. यातून व्हॉट्सअॅपप्रमाणेच व्हिडिओ कॉलिंग केली जाऊ शकते. युजर्स रिअल टाइम टेक्स्ट, मेसेज, व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओही शेअर करू शकतील. या अॅपमध्ये लोकेशन शेअरिंगचेही फीचर आहे.

- दावा करण्यात आला आहे की, हे अॅप पूर्णपणे इनक्रिप्टेड आणि सुरक्षित आहे आणि यात व्हॉट्सअॅपप्रमाणे कोणत्याही जाहिराती दिसणार नाहीत. पतंजलि कम्युनिकेशनचा दावा आहे की, याचे फीचर्स व्हॉट्सअॅपला टक्कर देणारे आहेत.

 

गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध
- 23 एमबी साइजचे हे अॅप बुधवारी गुगल प्लेस्टोअरवर अपडेट करण्यात आले आहे. हे एका हिरव्या रंगाच्या शंखाच्या लोगोसोबत लोकांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. अॅपबाबत गुगल प्ले-स्टोअरवर स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. याच्या डेव्हलपरचा पत्ता- पतंजली आयुर्वेद लिमिटेड, डिपार्टमेंट ई-कॉमर्स, D-28 इंडस्ट्रियल एरिया, निअर इन्कम टॅक्स ऑफिस, हरिद्वार, उत्तराखंड, 249401 देण्यात आला आहे. जो पतंजली कंपनीचा पत्ता आहे.

 

किम्भोवर युजर्सच्या कॉमेंट्स
> एक चांगली सुरुवात करून कमीत कमी हा विचार करतात की, व्हॉट्सअॅपच्या तोडीसतोड काही येऊ शकते. - मृदुल जोशी

> बेहतरीन.. जास्तीत जास्त देशवासीयांनी याचा वापर करावा. स्वदेशीचा स्वीकार करावा, देशाला सुदृढ बनवावे. - निशांत भावसार

> एक आणखी उत्तम सुरुवात. यासाठी आम्ही तुमचे आभारी राहूत. - विनय कुशवाहा

 


2 दिवसांपूर्वीच लाँच केले होते स्वदेशी समृद्धि सिम कार्ड
- पतंजलि आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने मिळून रविवारी स्वदेशी समृद्धि सिम लॉन्च केले होता. हे सिम कार्ड सध्या केवळ पतंजलिच्या कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. 144 रुपयांच्या रिचार्जमध्ये प्रत्येक यूजरला 2GB डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. सोबतच या सिमच्या माध्यमातून पतंजलि प्रोडक्ट्सवर 10% पर्यंत डिस्काउंटही मिळेल.

 

रामदेव म्हणाले- देशाची सेवा करण्याचेच लक्ष्य
- सिम लॉन्चिंगच्या वेळी बाबा रामदेव म्हणाले होते की, बीएसएनएल एक स्वदेशी नेटवर्क आहे आणि पतंजलि व बीएसएनएलचे लक्ष्य देशाची सेवा करणेच आहे.
- "कंपनीचे लक्ष्य चॅरिटी करणे आहे. ते म्हणाले की, आमचे नेटवर्क स्वस्त डाटा आणि कॉल पॅकेज देईल, तसेच लोकांना हेल्थ आणि लाइफ इन्श्युरन्सची सुविधाही देईल."
- तथापि, रामदेव असेही म्हणाले की, इन्श्युरन्स फक्त रोड अॅक्सिडेंट झाल्यावरच कव्हर केला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...