आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Badrinath Temple Portals Opened केदारनाथनंतर आज सकाळी उघडले बद्रीनाथचे दरवाजे

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केदारनाथनंतर आज सकाळी उघडले बद्रीनाथचे दरवाजे, पहिल्याच दिवशी दर्शनासाठी उसळली भक्तांची गर्दी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- चार धाम करणाऱ्या तीर्थयात्रेकरूंचा आकडा या वेळी 30 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

- पहिल्या दिवशी भगवान बद्रीविशाल यांचा शृंगार केला जात नाही. विशेष पूजाही होत नाही.

 

डेहराडून - आर्मी बँडच्या गजरात सोमवारी पहाटे 4.30 वाजता बद्रीनाथ धामाचे दरवाजे उघडण्यात आले. यानिमित्त मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली. लेजर शोच्या माध्यमातून ब्रदीनाथाची महिमा चित्रित करण्यात आली आहे. बाहेर भक्तांची उसळलेली गर्दी जयजयकाराने आपला आवाज भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती. तथापि, रविवारी पहाटेच केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले होते.

 

केदारनाथाचे हजारो भक्तांनी घेतले दर्शन; 20 क्विंटल फुलांनी सजवले धाम

 

आर्मी बँडच्या गजरात मंदिर परिसरात लावल्या देवाच्या मूर्ती
- दरवाजे उघडण्याआधी भगवान शंकराचार्य आणि भगवान कुबेर यांच्या मूर्ती आर्मी बँडच्या गजरात मंदिरात आणण्यात आल्या.
- पहिल्याच दिवशी देवाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली. मागच्या दोन दिवसांत हजारो भक्त बाबाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत.


आज फक्त निर्वाण दर्शन
- सोमवारी भगवान बद्रीनाथाचे फक्त निर्वाण दर्शन होतील. या दिवशी भगवंताचा शृंगार केला जात नाही. विशेष पूजाही होत नाही. फक्त संध्याकाळी आरती होते. 
- दुसऱ्या दिवसापासून देवाची दररोज विशेष पूजा केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...