आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: सुनेने केला बलात्काराचा आरोप, दु:खी सासऱ्याने लोकलज्जेमुळे घेतला गळफास Bahu Accused Of Rapd In Gwalior, Mournful Father In Law Hanged In Embarrassment

Shocking: सुनेने केला बलात्काराचा आरोप, दु:खी सासऱ्याने लोकलज्जेमुळे घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनेने बलात्काराचा आरोप लावल्याने सासऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. - Divya Marathi
सुनेने बलात्काराचा आरोप लावल्याने सासऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

ग्वाल्हेर - शहरातील थाटीपुर परिसरात स्वत:च्या सुनेनेच बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यावरून दु:खी सासऱ्याने लोकलज्जेमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. थाटीपुर पोलिसांनी प्रकरण दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत रमेशचंद्र रजक चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते.

- सूत्रांनुसार, थाटीपूरच्या जिवाजी नगरात राहणारे रमेश बाथमी यांनी गुरुवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. वास्तविक, रमेश यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेनेच पोलिसांत बलात्काराची केस दाखल केली होती. हे प्रकरण बुधवारी रात्री 12 वाजता पोलिसांत दाखल झाले होते. यानंतर सकाळीच त्यांनी घराच्या छताला केबलने गळफास लावला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टामॉर्टमसाठी पाठवला.

- याप्रकरणी मृत रमेश यांचा मुलगा म्हणाला की, त्याच्या पत्नीने त्याच्या वडिलांविरुद्ध खोटी केस दाखल केली आहे, यामुळेच त्यांनी दु:खी होऊन आत्महत्या केली. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. पोलिस म्हणाले की, सुनेने बुधवारी थाटीपुर पोलिस स्टेशन तक्रार दाखल केली होती. यात सासरा रमेशवर 29 एप्रिल रोजी कुटुंबातील सदस्य जेव्हा एका लग्नासाठी बाहेर गेले होते, तेव्हा सासऱ्याने तिच्यावर रेप केल्याचे म्हटले आहे.

- दुसरीकडे, कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आरोप करणारी सून 11 मेपासून नातेवाइकासोबत बेपत्ता झाली होती आणि परतल्यावर बुधवारी बलात्काराची एफआयआर दाखल केली. थाटीपुर पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवून विस्तृत तपास सुरू केला आहे.

 

ही तक्रार नोंदवली
- टीआय रविंद्र गुर्जर म्हणाले, रमेशचंद्रच्या कुटुंबातील महिलेने पोलिसांत सांगितले की,  29 एप्रिल रोजी घरातील सदस्य लग्न समारंभासाठी गेले होते. यादरम्यान ती घरात एकटीच होती. रमेशचंद्र रात्री 2 वाजता तिच्या रूममध्ये गेला आणि जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. तिने ही बाब घरच्यांनाही सांगितली. परंतु कुणीच तिच्या बोलण्यावर लक्ष दिले नाही, उलट बंधक बनवले. 15 मे रोजी संधी मिळाल्यावर ती आपल्या दोन मुलांसोबत माहेरी निघून गेली आणि भावाला हकिगत सांगितली.

 

वडिलांवर खोटा आरोप, ते दु:खी होते
- माझ्या वडिलांविरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार देणारी महिला 11 मे रोजीच घर सोडून गेली होती, ती आपल्या नातेवाइकासोबत गेली होती. ज्याच्यासोबत गेली त्याच्याशी तिची मैत्री होती. ती हरवल्याची तक्रारही आम्ही पोलिसांत दिली होती. महिलेला वागणे सुधारण्यासाठी वडील म्हणाले होते. बहुधा त्यामुळेच तिने त्यांना खोट्या आरोपात अडकवले. या आरोपामुळे वडील खूप दु:खी झाले होते. पोलिसांनी मला संध्याकाळपासूनच पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवले होते. रात्री 8.30 वाजता वडिलांनी फोन केला म्हणाले की, तेही पोलिस स्टेशनला येत आहेत. यादरम्यान तेही रडत होते. यानंतर त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली, तेव्हा कुठे पोलिसांनी मला सोडले. 
- ब्रजेंद्र, मृत रमेशचा मुलगा

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...