आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाली- इंडोनेशियाची राजधानी बाली येथे रविवारी न्येपी सण साजरा झाला. तो दिवस तेथे डे ऑफ सायलेन्स म्हणून साजरा होतो. डे ऑफ सायलेन्स म्हणजे शांततेचा दिवस. या २४ तासांत पूर्ण बालीत सामसूम असते. टीव्ही, इंटरनेट बंद असते. लोक घरांतील दिवेही विझवतात, मौन व्रत ठेवतात आणि घरातच बसून राहतात. रेल्वेस्थानके, विमानतळ ठप्प होतात. रस्त्यांवर सामसूम असते.
मौन राहून लोक आपले मन, मेंदू आणि आत्मा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. न्येपी हा बालीच्या हिंदू समुदायाचा प्रमुख सण आहे. ही परंपरा १ हजार वर्षांहून जुनी आहे. प्रत्येक वर्षी हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त तो साजरा केला जातो. या वर्षी न्येपीची वेळ १७ मार्चच्या सकाळी ६ ते १८ मार्चची सकाळ अशी होती. गेल्या वर्षी न्येपीनिमित्त टीव्ही ऑपरेटर्सनी वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित केले होते. त्याचा विरोध झाल्याने या वर्षी सर्व टीव्ही ऑपरेटर्सनी २४ तास शटडाऊन ठेवले. न्येपीनिमित्त बालीत जेवढी शांतता असते, त्याआधी एक दिवस ‘ओगो-ओगो’ हा तेवढाच उत्साहजनक सण साजरा होतो. यंदाही ओगो-ओगो साजरा करण्यासाठी बालीच्या वेगवेगळ्या बीचवर २५ हजारपेक्षा जास्त लोक जमा झाले. अनेक खेळ आयोजित झाले. फायर स्पोर्ट््सही (आगीचे खेळ) झाले, पण १७ मार्चच्या सकाळी ६ वाजेआधीचे ते थांबले. न्येपीच्या व्यवस्थेची जबाबदारी ‘पेसेलांग’ ही बालीची हिंदू सेना घेते. पेसेलांगच्या सदस्यांनी २४ तास विमानतळ, स्थानके, थिएटर, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रस्त्यांवर पहारा दिला.
पुढील स्लाइडवर पाहा, डे ऑफ सायलेन्सला बालीत अशी सामसूम असते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.