आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • धक्कादायक: पत्नी अन् 2 मुलींची हत्या करून स्वत: घेतला गळफास Bank Manager Family Death Scandal

पत्नी अन् 2 मुलींची हत्या करून स्वत: घेतला गळफास, पती होता डॉक्टर तर पत्नी बँक मॅनेजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्तीपूर (बिहार) - 21 मे रोजी झालेल्या बँक मॅनेजर कुटुंबाच्या हत्याकांड प्रकरणी चकित करणारी पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आली आहे. सरकारी रुग्णालयातील 3 डॉक्टरांच्या बोर्डने रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे की, डॉ. रितेशचे बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर असलेली पत्नी पूजा, मुली सृष्टी आणि श्रेया यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाला आहे. तर डॉ. रितेशचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला. चौघांचा मृत्यू होऊन 30 ते 36 तास झाले होते.

- पोलिस आता याप्रकरणी फॉरेंसिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. रिपोर्ट यायला दोन महिन्यांचा काळ लागू शकतो.
- पोलिसांनी मृतदेहांचा व्हिसेरा राखीव ठेवला होता. ट्रेकियाही काढून फॉरेंसिक लॅबला पाठवला आहे.
- हत्येच्या आधी बँक मॅनेजर व दोन्ही मुलींना अंमली पदार्थ दिला होता का, हे रिपोर्टमधून स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

बाहेरून कुणीही आल्याचा सुगावा नाही
- आतापर्यंतच्या चौकशीत घराच्या आत 4 जणांशिवाय आणखी कुणी असल्याचा पुरावा मिळालेला नाही.
- सीसीटीव्ही फुटेजमध्येही रविवारी रात्रीनंतर सोमवारी सकाळी बँक मॅनेजरची मोलकरीण खालून वर जाताना दिसली.
- फॉरेंसिक टीमलाही घटनास्थळी बाहेरचे कुणी आल्याचा कोणताही सुगावा मिळालेला नाही.

 

मॅनेजरच्या आईने मुलीच्या सासू-सासऱ्यांवर लावले आरोप
- डॉ. रितेश यांच्या सासू रामदुलारी देवी यांनी पोलिसांत अर्ज देऊन व्याही आणि विहिनीवर जावयाला हत्येसाठी मजबूर केल्याचा आरोप केला आहे.

 

डॉक्टरने तणावात येऊन उचलले टोकाचे पाऊल
- पोलिसांनी डॉक्टरच्या रूममधून डिप्रेशनचे औषध आणि प्रिस्क्रिप्शन हस्तगत केले होते.
- यात तणाव आल्यावर कोणकोणती औषधे डॉ. रितेश आणि त्यांची मॅनेजर पत्नी पूजा घ्यायचे याचा उल्लेख आहे.

 

फॉरेंसिक रिपोर्टची प्रतीक्षा
- एसपी दीपक रंजन यांनी याप्रकरणी फॉरेंसिक रिपोर्टची वाट पाहत असल्याचे म्हटले. तथापि, या घटनेत कुठूनही बाहेरच्या कुणाचा हात असल्याचे अजूनपर्यंत समोर आलेले नाही.
- डॉ. रितेश यांनी डिप्रेशनमुळेच पत्नी व मुलींची हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेतला होता. रितेशच्या रूममधून डिप्रेशनचे औषध व डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन हस्तगत करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...