आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • लेडी पोलिसने रिक्षा चालकाच्या श्रीमुखात भडकावली

लेडी पोलिसने रिक्षा चालकाच्या श्रीमुखात भडकावली, Video Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छत्तीसगड) - महिला पोलिस कर्मचारी मोपेडवरुन जात असताना स्लिप झाल्या आणि रस्त्यावर पडल्या. त्यांच्या मदतीसाठी धाऊन गेलेल्या रिक्षाचालकाचे आभार मानण्या ऐवजी त्यातील एक महिला कॉन्स्टेबलने त्याच्याच श्रीमुखात भडकवली. हा सर्व प्रकार एका प्रत्यक्षदर्शी युवतीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. 

 

काय आहे घटना 
- नर्मदापारा येथे बुधवारी सायंकाळी एका मोपेडवर RPF च्या  तीन महिला पोलिस कर्मचारी चालल्या होत्या. त्यांची मोपेड स्लिप झाली आणि तिघीही रस्त्यावर पडल्या. हे पाहून एक रिक्षाचालक त्यांच्या मदतीसाठी धावला. तेव्हा चिडलेल्या महिला पोलिसाने त्याच्या श्रीमुखात भडकावली. 

- प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार तीन लेडी पोलिस एका मोपेडवरुन जात होत्या. त्यांनी हेल्मेटही घातलेले नव्हते. अचानक त्यांची मोपेड स्लिप झाली आणि तिघीही खाली पडल्या. मोपेडच्या मागे एक ऑटो चालला होता. ऑटो चालकाने थांबून त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका लेडी पोलिसने त्याला जोरदार थप्पड लगावली. लेडी पोलिसांचा गैरसमज झाला की रिक्षा चालकाने त्यांना कट मारला आणि त्या खाली पडल्या.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा Video 

बातम्या आणखी आहेत...