Home | National | Other State | बालकामगाराला मालकाकडून थर्ड डिग्री टॉर्चर beating minor servant by owner

बालकामगाराला मालकाकडून थर्ड डिग्री टॉर्चर, CM कडे कैफियत मांडायला गेलेल्या आईला पोलिसांनी पिटाळले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 12, 2018, 01:00 PM IST

मुख्यमंत्री योगींच्या गोरखपूरमध्ये अल्पवयीन मुलाला ईदची सुटी मागितली म्हणून चोरीचा आरोप लावत मालकाकडून अमानुष मारहाण.

 • बालकामगाराला मालकाकडून थर्ड डिग्री टॉर्चर beating minor servant by owner
  मालक आणि त्याच्या मुलाने अल्पवयीन कामगाराला लाथा-बुक्यांसह बेल्टने मारले.

  गोरखपूर (उत्तर प्रदेश) - जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या दिवशीच एका बालकामगाराला अमानुष मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये ही घटना घडली आहे. ईदसाठी 4 दिवसांची सुटी आणि 4 महिन्यांचा थकित पगार बालकामगाराने मागितला होता. मालकाने त्याला सुटी आणि पगार देण्याएवजी चोरीचा आरोप करत अमानुष मारहाण केली. मालकाने या घटनेचा व्हिडिओ देखील स्वतः तयार केला होता. या घटनेची कैफियत मांडण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या जनता दरबारात गेलेल्या पीडित मुलाच्या आईला पोलिसांनी पिटाळून लावले.

  भाजप सरकारचे बालमजुरांकडे दुर्लक्ष होत असल्याचा हा व्हिडिओ पुरावा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विशेष म्हणजे बालकामगाराला मारहाणीची घटना मुख्यमंत्री योगींच्या गोरखपूरमध्ये घडली आहे.

  काय आहे घटना...
  - गोरखपूरमध्ये एका अल्पवयीन नोकराला मालक आणि त्याचा मुलगा लाथा-बुक्यांनी आणि नंतर चामडी बेल्टने मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
  - विशेष म्हणजे, या घटनेची तक्रार करण्यासाठी अल्पवयीन मुलाची आई जेव्हा मुख्यमंत्री योगींच्या जनता दरबारात पोहोचते तेव्हा पोलिस या महिलेला पिटाळून लावतात.
  - पीडित मुलाच्या आईने मीडियाला सांगितले, की मुलावर 100 रुपये चोरीचा आरोप करण्यात आला होता.
  - मुलगा म्हणाला, मी ईदच्या निमित्ताने 4 दिवसांची सुटी आणि माझा 4 महिन्यांचा पगार मागितला होता. मालक आणि त्याच्या मुलाने पगार न देता माझ्यावर 100 रुपये चोरीचा आरोप केला आणि बेदम मारहाण केली.

  पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वतः मालकाने तयार केलेला VIDEO

 • मुलाने सांगितले की ईदची सुटी आणि चार महिन्यांचा थकित पगार मागितला होता.

Trending