आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोफेशनल ब्लॅकमेलर निघाली तरुणी, सौंदर्याच्या जाळ्यात अडकवायची हाईप्रोफाइल मासे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बक्सर/डुमराव (बिहार) - शशांक हत्याकांड (08 जून) ला आठवडा उलटला आहे. पण वडील राकेश राय उर्फ रिंकू राय यांनी पोलिसांना काहीही सांगितलेले नाही. पोलिसांना या प्रकरणात मुख्य आरोपी काजल रायला अटक करता आलेली नसली तरी, काजल आणि रिंकू यांच्यातील संबंधांवरून एकापाठोपाठ एक पडदे बाजुला होत आहेत. पोलिस सुत्रांच्या मते छापेमारीदरम्यानचे काही फोटो पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरून स्पष्ट झाले आहे की, काजल प्रोफेशनल ब्लॅकमेलर आहे. ती डीएसपी, डॉक्टरसह अनेक पांढरपेशा लोकांवर रेपचे गुन्हे दाखल करून पैसे उकळत आलेली आहे. 


सौंदर्याने हायप्रोफाइल लोकांना करायची घायाळ.. 
- पोलिसांना काजलचे अनेक फोटो मिळाले आहेत. त्यात मृत शशांकचे वडील राकेश राय बरोबरचेही काजलचे फोटो आहेत. 
- पोलिसांच्या मते, या फोटोद्वारे ती राकेशला ब्लॅकमेल करत होती. 
- सौंदर्याच्या जीवावर अनेकांना घायाळ करून तिने कोट्यवधी रुपये हडपले आहेत. 

 

अनेकांना ब्लॅकमेल केले 
- काजलने यापूर्वीही अनेकांना रेपच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. 
- शशांक हत्या प्रकरणात चंदन रायचे नावही आले होते. दुसरीकडे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, काजलचा भाऊ तिच्या बहिणीचे आयुष्य राकेश ने उध्वस्त केले असे समजतो. 
- त्याने हिशेब चुकता करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे पोलिसांनी काजलच्या भावाची चौकशीही सुरू केली आहे. 

 

काय घडले.. 
8 जूनला शशांकचे अपहरण झाले होते. त्यावेळी तो त्याच्या आजीच्या घरी आलेला होता. अपहरण केल्यानंतर गुन्हेगारांनी गाझीपूरमध्ये नेऊन त्याची हत्या केली होती. गंगेच्या वाळूत त्याचा मृतदेह आढळला होता. 

(वरील सर्व फोटो सोशल मीडियावरील आहेत.)

 

बातम्या आणखी आहेत...