• Home
  • National
  • Before Court Verdict Saif Ali Khan Face Problom At Jodhpur Airport

काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर / काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालय आज निकाल देणार; 20 वर्षांपूर्वीचा गुन्हा

२० वर्षांपूर्वीच्या जोधपूरजवळील कांकाणी गावात दोन काळविटांची शिकार केल्यावरून सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्री यांच्या न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. न्यायालयाचा निर्णय येणार असल्याने मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानसह सहआरोपी सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम व सोनाली बेंद्रे बुधवारी जोधपूरला दाखल झाले. गँगस्टर लॉरेन्स याने दिलेल्या धमकीमुळे पोलिसांनी विमानतळाबाहेर पडताच सलमान खान यास सुरक्षा दिली. सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा व अर्पिता तसेच दोन वकील हजर होते. सलमान खान दोषी ठरल्यास त्याला कमीत कमी एक वर्षे व जास्तीत जास्त सहा वर्षे शिक्षा होऊ शकते.

Apr 05,2018 02:00:00 AM IST

जोधपूर- २० वर्षांपूर्वीच्या जोधपूरजवळील कांकाणी गावात दोन काळविटांची शिकार केल्यावरून सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्री यांच्या न्यायालयात गुरुवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. न्यायालयाचा निर्णय येणार असल्याने मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानसह सहआरोपी सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, नीलम व सोनाली बेंद्रे बुधवारी जोधपूरला दाखल झाले. गँगस्टर लॉरेन्स याने दिलेल्या धमकीमुळे पोलिसांनी विमानतळाबाहेर पडताच सलमान खान यास सुरक्षा दिली. सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा व अर्पिता तसेच दोन वकील हजर होते. सलमान खान दोषी ठरल्यास त्याला कमीत कमी एक वर्षे व जास्तीत जास्त सहा वर्षे शिक्षा होऊ शकते.


याप्रकरणी सैफ अली, नीलम, तब्बू व सोनाली सहआरोपी आहेत. त्यांच्यावर १ व २ ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्रीस कांकाणी गावात काळवीट दिसल्याने या चौघांनी त्या काळविटांची शिकार करण्यासाठी सलमान खान यास प्रवृत्त केले होते. या संपूर्ण प्रकरणात फिर्यादींनी सलमान खानवर काळविटांची शिकार केल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी ५१ साक्षीदारांची यादी दिली होती. परंतु २८ साक्षीदार हजर झाले, तर सलमानकडून बचावासाठी एकही साक्षीदार सादर करण्यात आला नव्हता. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सलमानने फिर्यादीच्या २८ साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सलमानच्या स्पॉटबॉयला पकडण्यात अपयश
हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना स्पॉटबॉय म्हणून काम करणारा दिनेश गावरे यात आरोपी होता. उच्च न्यायालयाकडून हंगामी जामीन मिळताच तो फरार झाला. त्याला पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. फिर्यादी पक्षाने सांगितले, सलमान खान याने त्याच्या खास माणसाकडून दिनेशला गायब करण्यात आले आहे. तो पकडला गेला असता, तर आरोपीचे सर्व बिंग फुटले असते. तर बचाव पक्षाकडून सांगण्यात आले की, गावरेचा आणि सलमानचा काहीएक संबंध नाही. गावरे सापडू शकत नाही, हे फिर्यादी पक्षाचे अपयश आहे.

दोषी ठरल्यास १ ते ६ वर्षांची शिक्षा शक्य
सलमान खान विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ५१ नुसार काळविटांची शिकार केल्याचा आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यास सलमानला कमीत कमी एक वर्ष तर जास्तीत जास्त सहा वर्षाची शिक्षा होऊ शकते. तर अन्य आरोपी सैफ अली, सोनाली, नीलम, तब्बू व दुष्यंतसिंह याच्यावर सलमानला शिकारीस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून व बेकायदेशीर जमाव जमवून शिकारीत सहभागी झाल्याचा आरोप आहे. विधीज्ञांनी सांगितले, सलमान दोषी ठरला तर या आरोपींना त्याच्या इतकीस शिक्षा होऊ शकते.

X