आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीआधी विरोधकांच्या आघाडीची शक्यता धूसरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन होण्याची शक्यता कमीच दिसते, असे मत माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. 
पाटणा येथे पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना येचुरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची आघाडी स्थापन होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. याआधीही राष्ट्रीय स्तरावर अशी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय आघाडी आणि डाव्या आघाडीची स्थापना झाली होती.

 

या निवडणुकीनंतरच विश्वनाथ प्रताप सिंह देशाचे पंतप्रधान झाले होते.
येचुरी म्हणाले की, केंद्रातून नरेंद्र मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी आमचा पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मतांचे विभाजन रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहेत. देशातील जनता रालोआ सरकारच्या कामगिरीमुळे खूप निराश आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपला विरोध करायला हवा.  विरोधी पक्षांनी आपली ऊर्जा नष्ट करण्याऐवजी भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न करावा. आघाडीच्या नेतृत्वाचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...