आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पत्नीच्या Facebook व्यसनामुळे त्रस्त होता पती; वाद एवढा विकोपाला गेला की 2 वर्षांच्या मुलाचा विचारही नाही केला Bengaluru Couple Fight Over Facebook Addiction And Hang Themselves

पत्नीच्या Facebook व्यसनामुळे त्रस्त होता पती; वाद एवढा विकोपाला गेला की 2 वर्षांच्या मुलाचा विचारही नाही केला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> बंगळुरूत एका दांपत्याचे फेसबुक अॅडिक्शनवरून जोरदार भांडण झाले.

> भांडणानंतर पती-पत्नीने घरात गळफास घेतला.
> पोलिसांना घराच्या हॉलमध्ये बसलेला आढळला 2 वर्षांचा मुलगा.

 

बंगळुरू - कर्नाटकात फेसबुकच्या व्यसनाने सुखी संसाराची राखरांगोळी केली. येथे बंगळुरूत राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याचे फेसबुक अॅडिक्शनवरून झालेले भांडण एवढे विकोपाला गेले की, दोघांनीही आत्महत्या केली. भांडणानंतर दोघांनीही गळफास घेतला. त्यांचे मृतदेह घरातील वेगवेगळ्या रूममध्ये लटकलेले आढळलेले. दुसरीकडे, जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांचा दोन वर्षांचा मुलगा घरातील हॉलमध्ये बसलेला त्यांना आढळला.

- पोलिस म्हणाले की, अनुप पॉल्ट्री फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत डेप्युटी मॅनेजर होता, तर त्याची पत्नी सौम्या गृहिणी होती.
- हे जोडपे कोडागूच्या मूळचे सोमवारपेटचे होते आणि मागच्या दीड वर्षापासून आपल्या एकुलत्या एका मुलासह तुमाकुरू रोडवर बगलगुंटे येथे राहत होते.
- पोलिस म्हणाले की, दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या रूममध्ये पंख्याला लटकलेले आढळले. सर्वात आधी कोणी आत्महत्या केली, याबद्दल पोलिस अजून कन्फर्म नाहीत. 
- तथापि, पोलिस मानतात की, यापैकी एकाने आधी आत्महत्या केली असावी, जी पाहून दुसऱ्यानेही टोकाचे पाऊल उचलले.
- पोलिसांच्या मते, अनुप त्याची पत्नी फेसबुकवर जास्त वेळ घालवत असल्याने खूप त्रस्त होता. याबाबत त्याने आपल्या पत्नीला अनेक वेळा ताकीदही दिली होती.
- रविवारी रात्री याच बाबीवरून दोघांमध्ये जबरदस्त भांडण झाले. अनुपने सौम्याचा भाऊ रविचंद्र यालाही फोन करून आपल्या बहिणीला घेऊन जाण्याविषयी सांगितले.
- अनुप म्हणाला की, त्याला सौम्यासोबत राहायचे नाही. यामुळे रविचंद्रने अनुपला ही बाब न वाढवण्याविषयी सांगून विश्वास दिला की, सौम्याशी तो यावर बोलेल.
- यानंतर सोमवारी सकाळी सौम्यानेही 7.30 वाजता आपला भाऊ रविचंद्रला फोन केला आणि अनुपसोबत झालेल्या भांडणाबाबत सर्वकाही सांगितले. सौम्याने त्याला बंगळुरूला येण्याविषयीही सांगितले.
- रविचंद्र सोमवारीच दीड वाजता आपल्या बहिणीच्या घरी पोहोचला, परंतु कोणीही दार उघडले नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली.
- पोलिसांनी येऊन दार तोडल्यावर त्यांना हॉलमध्ये त्यांचा दोन वर्षांचा मुलगा हार्दिक बसलेला आढळला. दुसरीकडे, अनुप आणि सौम्याचे मृतदेह दोन वेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला लटकलेले आढळले.
- पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. केस रजिस्टर्ड करून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शेजाऱ्यांचेही जबाब नोंदवले आहेत.   

बातम्या आणखी आहेत...