आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आत्महत्येच्या ठीक आधी भय्यू महाराजांनी केले हे ट्विट, फेसबुक पोस्टही केली Bhaiyyu Ji Maharaj Last Tweet And Facebook Post Just Before Suicide Latest News And Updates

आत्महत्येच्या ठीक आधी भय्यू महाराजांनी केले हे ट्विट, फेसबुक पोस्टही केली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे भक्त आणि समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

भय्यूजी महाराज सोशल मीडियावर खूप सक्रिय राहत होते. मृत्यूच्या काही वेळ आधी त्यांनी काही पोस्ट्स आणि ट्विट केले होते, परंतु यावरून त्यांच्या तणावयुक्त मानसिक स्थितीचा अंदाज कुणालाच आला नाही.

भय्यूजी महाराजांच्या ट्विटर अकाउंटवरून 1 वाजून 57 मिनिटांनी शेवटचे ट्विट आले होते आणि थोड्या वेळानेच त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले.
आपल्या या ट्विटमधून त्यांनी भक्तांना मासिक शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तथापि, हे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड नाही.
आत्महत्येच्या काही तासांपूर्वीच भय्यूजी महाराजांनी फेसबुकवरही एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर भाष्य केले होते.

त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये शेतकऱ्यांच्या समस्येवर लिहिले की, "आपली सर्व अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. आज देशातील अनेक भागांत पाण्याची पर्याप्त सुविधा नाही. याचा शेतीवर थेट प्रभाव पडत आहे... शेती व आपल्या जीवनमानासाठी जलसंवर्धन व संधारण अतिआवश्यक आहे. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाण्याची आवश्यकत आहे."
तथापि, इतरांच्या अडचणी सोडवणारे भय्यू महाराज स्वत: आपल्या आयुष्याला कंटाळतील याची कुणालाही कल्पना नव्हती. 

एका दुसऱ्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी भाजप नेते नरेंद्रसिंह तोमर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तथापि, सुसाइड नोटमध्ये भय्यूजी महाराजांनी पारिवारिक कलह आणि डिप्रेशनचा उल्लेख केला आहे, तथापि, त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार ठरवले नाही. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, भय्यू महाराजांनी आत्महत्येआधी केलेल ट्विट व फेसबुक पोस्ट...

 

बातम्या आणखी आहेत...