आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्तऐवज होते, सरकारच्या दबावामुळेच आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट Bhaiyyu Maharaj Suicide Case Latest News And Updates

भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्तऐवज होते, सरकारच्या दबावामुळेच आत्महत्या केल्याचा गौप्यस्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी 12 जून रोजी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर घटनास्थळी सुसाइड नोट आढळली. ज्याद्वारे त्यांनी कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, भय्यू महाराजांवर सरकारचा दबाव होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने केला आहे.

याबाबत सविस्तर सांगताना ते म्हणाले, 'भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्तऐवज होते. त्यामुळेच सरकारने त्यांच्यावर दबाव वाढवला होता, यामुळेच भय्यूजींनी आत्महत्या केली असून या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी,' अशी मागणी करणी सेनेने केली आहे. करणी सेनेच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 

राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. दुसरीकडे, भय्यू महाराजांनी ज्यांना हिंमत देऊन मार्ग दाखवला होता, त्यांत सेंधवाचे व्यावसायिक अजय गोयलही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नुकसान होत असल्याने ते हताश झाले होते. तथापि, सुसाइड करण्यासारखा विचार नव्हता, परंतु मोडून पडले होते.

करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दावा केला की, भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे दस्तऐवज होते. त्यांनी हे दस्तऐवज जनतेसमोर आणून नयेत म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला. तशी माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्रोतांकडून मिळाल्याचं गोगामेडी यांनी सांगितलं. तथापि, गोगामेडींनी कुठलाही पुरावा यासाठी सादर केला नाही. 

'सरकार खरेच प्रामाणिक असेल तर सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. मग सत्य समोर येईल. सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करेल,' असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. भय्यू महाराज यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबीयांचा, शिष्यांचा किंवा सरकारशी संबंधित व्यक्तीचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त करतानाच भय्यूजींच्या अंत्यसंस्काराला कोणताही मोठा नेता किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...