आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 महिन्यात 6 मृत्यू: सरकार म्हणते भूकबळी नाही, मग त्यांनीच सांगावे कसा झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतोषीचा मृतदेह कवटाळून तिची आई कायली देवी. - Divya Marathi
संतोषीचा मृतदेह कवटाळून तिची आई कायली देवी.

रांची - आजही जगात कोणतेही आजारपण किंवा युद्धापेक्षा सर्वाधिक मृत्यू हे भुकेमुळे होत आहेत. भारतातच 10 कोटींपेक्षा जास्त लोकांचा रोजचा खर्च हा 20 रुपयांपेक्षा कमी आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालानुसार जगातील भुकपीडितांपैकी एक तृतीयांश भारतात आहेत. तरीही देशातील सर्वाधिक आर्थिक विवंचनेतील आणि सोयीसुविधांपासून वंचित आदिवासी बहुल राज्यांपैकी एक असलेल्या झारखंडमध्ये जेव्हा-जेव्हा एखादा भूकबळी जातो, तेव्हा सरकारी यंत्रणा आपली पूर्ण ताकद हे सिद्ध करण्यासाठी लावली जाते की, हा भूकबळी नाही. 

सर्वाधिक वाईट आणि लाजीरवाणी बाब म्हणजे, गेल्या आठ महिन्यात राज्यातील विविध भागात 6 जणांचा मृत्यू हा अन्नावाचून झाला आहे. पीडितांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनीही ते भूकबळी असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्येकवेळी स्थानिक प्रशासनाने चौकशी करुन मृत्यू भूकबळीमुळे नसल्याचे म्हटले आहे. 

 

राज्यातील या महत्त्वाच्या समस्येकडे जेव्हा आम्ही सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण मंत्री सरयू राय यांना थेट सवाल केला की अखेर हे केव्हा आणि कोणत्या लक्षणांनी मान्य केले जाईल की झालेला मृत्यू भूकबळी होता? उत्तर मिळाले की विभाग अजून चौकशी करत आहे. मात्र भूकबळी नेमके कशाला म्हणायचे हे निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्याचे निकष ठरवले जातील. समितीचा अहवाल येईल तेव्हा येईल मात्र आतापर्यंत झालेल्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी सरकारने फक्त चतरा येथील घटना सोडल्यास एकही पोस्टमॉर्टम केलेले नाही. प्रत्येकवेळी नातेवाईक पोस्टमॉर्टमसाठी तयार नाहीत, असे सांगून चौकशी टाळली आहे. प्राथमिक चौकशीत थंडी आणि साधाराण आजारामुळे मृत्यू झाल्याचे कारण दिले गेले होते. 

बातम्या आणखी आहेत...