आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राज्यांत महिला सर्वात उपेक्षित,सशक्त तसेच बंधनातही अडकलेल्या;वाचा भास्‍करचा ग्राउंड रिपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांची झपाट्याने प्रगती हाेत अाहे, मात्र अाव्हानेही अाहेत. हे बदल व अाव्हाने अापल्याला माहिती व्हावीत यासाठी दैनिक भास्करने चार राज्यांतून ग्राउंड रिपाेर्ट मिळवले अाहेत.  या राज्यांत महिला सर्वात उपेक्षित, सशक्त तसेच  बंधनातही अडकलेल्या अाहेत, तसेच सर्वाधिक महिला मतदारही.

 

हरियाणा : पूर्वी सर्वाधिक उपेक्षित, अाता सक्षम

कन्या भ्रूणहत्या, ऑनर किलिंग, महिला अत्याचाराचे गुन्हे, पुरुषी मानसिकतेचे वर्चस्व म्हणून हरियाणाची अाेळख हाेती. मात्र, अाता देशाची प्रसिद्ध महिला पहिलवान साक्षी मलिक व मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या राज्याचा चेहरा बनल्या अाहेत. अशा अजूनही अनेक क्षेत्रे अाहेत जिथे हरियाणाच्या महिलांनी नाव कमावले अाहे. मागील काही वर्षात या राज्यात महिलांच्या स्थितीत माेठी सुधारणा झाली. राजकारणातही त्यांचा सहभाग वाढत अाहे. दाेन वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ३३ % सरपंचांएेवजी ४२ % महिला सरपंच बनल्या. सध्या राज्यात २५६५ महिला सरपंच अाहेत.  तसेच देशात सर्वाधिक महिला अामदार (१४%) हरियाणातूनच अाहेत. इतकेच नव्हे, तर या ठिकाणी पुरुषांच्या साक्षरतेच्या तुलनेत महिलांचा साक्षरतेचा दर गतीने वाढताेय. दहा वर्षांपूर्वी येथील साक्षरतेचा दर ६०.४ टक्के हाेता, ताे अाता ७५.४ टक्क्यांपर्यंत वाढलाय.  साक्षरतेचे प्रमाण वाढण्याबराेबरच महिलांच्या जन्मदरातही माेठी सुधारणा झाली अाहे. अाराेग्य खात्याच्या माहितीनुसार, २०१४- १५ मध्ये राज्यात दरहजारी पुरुषांच्या तुलनेत केवळ ८७१ महिला हाेत्या. अाता ही संख्या दरहजारी ९३७ पर्यंत वाढली अाहे. मात्र, या चित्राची दुसरी बाजूही अाहे. महिलांसमाेरील अाव्हाने काही कमी नाहीत. २००५-०६ मध्ये येथील ५५.२ टक्के महिला अॅनिमियाग्रस्त हाेती. म्हणजे त्यांच्या रक्ताची कमतरता हाेती. २०१५- १६ मध्ये ही संख्या वाढून ६३.१ टक्के झाली. याशिवाय महिलांमध्ये स्वावलंबनाचे प्रमाणही वाढत अाहे. राज्यात १२४७३ बचत गट अाहेत, यातून दीड लाख महिलांना राेजगार मिळत अाहे. सरकारी नाेकऱ्यांत  सुमारे ४४ % महिला कर्मचारी अाहेत. राज्यातील ४५ % महिलांचे बँकांत खाते अाहे. १० वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त १२% हाेते. येथील महिला सॅनिटरी पॅड तयार करून ३५ गावांत विक्री करत अाहेत.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, काश्मीर : येथे त्यांच्यावर सर्वाधिक बंधने... 

बातम्या आणखी आहेत...