आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंड प्रवृत्‍तीच्‍या काही लोकांनी भय्यू महाराजांशी जवळीक साधून अनेकांची केली होती फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - संत भय्यू महाराज अात्महत्या प्रकरणात पाेलिसांचा तपास अाता त्यांच्या संपर्कात राहणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लाेकांवर केंद्रित झाला अाहे. इंदूर व पुण्यातील अाश्रमात काही जण भय्यू महाराजांच्या संपर्कात हाेते, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल हाेते, अशी माहिती पाेलिसांना मिळाली अाहे. याच लाेकांनी भय्यू महाराजांशी जवळीक साधून अनेकांची फसवणूक केल्याने अाश्रमात येणारे माेठे व्यापारी व समाजसेवक महाराजांपासून दूर राहू लागले हाेते. दुसरीकडे बुधवारी पाेलिसांनी भय्यू महाराजांच्या दाेन माेठ्या भावांचे जबाब घेतले.  

 

याशिवाय अाश्रमातील काही सेवेकरी व ट्रस्टशी संबंधित लाेकांकडून पाेलिसांना माहिती मिळाली की, महाराजांनी ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, त्यांनीच महाराजांना दु:ख दिले. पत्नी व मुलीला साेडले तर असे अनेक नजीकचे लाेक हाेते, जे महाराजांचे खास बनून अाश्रम व संस्थेच्या नावावर अार्थिक व्यवहार (डील) करायचे. त्यांच्यावरही पाेलिसांना संशय अाहे. त्यासाठी पाेलिस काही संशयिताच्या काॅल डिटेल्सची (सीडीअार) तपासणी करत अाहेत. तसेच भय्यू महाराजांना एखाद्या षड‌्यंत्रात तर फसवले जात नव्हते ना? या दिशेनेही पाेलिस तपास करत अाहेत.  

 

बुधवारी खजराना पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मनाेज रत्नाकर यांनी भय्यू महाराजांचे माेठे भाऊ दिलीप देशमुख (६२) व अरुण देशमुख (५९) यांचे जबाब घेतले. त्यात दाेन वर्षांपूर्वी भय्यू महाराजांनी अापणास श्री सद‌्गुरू धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे (इंदूर) चेअरमन बनवले हाेते. ते तेथे त्यांच्या वाडवडिलांच्या अनेक एकर जमिनीची देखरेख व सेवाकार्यास पुढे नेत हाेते, असे दिलीप देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...