आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोगीत जाळले जुने सामान, आकाशात धुरच धूर; अचानक 18 विमानांचा बदलावा लागला मार्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - भोगी उत्सवादरम्यान जाळण्यात येणाऱ्या जुनाट वस्तुंमुळे शहरात एवढा धूर झाला की विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. 18 विमानांचा रुट बदलावा लागला असून त्यांना बंगळुरु आणि हैदराबादला पाठवावे लागले. हे फ्लाइट्स कुवैत, शारजा आणि दिल्लीहून येत होते. एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, विमानतळावर शेवटचे फ्लाइट रात्री 2.50 वाजता आले आणि 3 वाजता रवाना झाले.' त्यांनी सांगितले की सर्व विमानतळांना फ्लाइट्सना उशिर होत असल्याची सूचना देण्यात आली आहे. 

 

फ्लाइट्स लेट, पॅसेंजर प्रतिक्षेत 
- एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितले, की शनिवारी पहाटे 4 ते 8 वाजता दरम्यान परिसरात धुरच धूर होता. त्यामुळे फ्लाइट्सच्या येण्या-जाण्यावर परिणाम झाला आहे. या दरम्यान एकही फ्लाइट उड्डाण करु शकलेले नाही. पॅसेंजर्सला विमानतळावरच थांबावे लागले आहे. 

 

काय असतो भोगी उत्सव... 
- तामिळनाडूमध्ये पिक काढणीच्या आधी पोंगल उत्सव साजरा केला जातो. पोंगलच्या चार दिवस आधी भोगी उत्सव केला जातो. भोगीपासूनच पोंगलला सुरुवात होते. 
- भोगीच्या निमित्ताने लोक घरातील जुने साहित्य, नको असलेले सामान घरासमोर आणून जाळतात. होळी प्रमाणेच आग पेटवून त्यात जुने सामान भस्म केले जाते. हा उत्सव म्हणजे जुन्याचा त्याग करुन नव्याचा स्वीकार याचे प्रतिक मानला जातो. 

बातम्या आणखी आहेत...