आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका तरुणीच्या \'भानगडी\'त शहीद झाला भारतीय जवान औरंगजेब, वाचा असा अडकला होता जाळ्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय सैन्यातील रायफलमन शहीद औरंगजेबचे दहशतवाद्यांनी केलेल्या अपहरण व हत्येच्या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. सूत्रांनुसार, औरंगजेबने अनेक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सचे उल्लंघन केले होते. याच कारणामुळे तो दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकला होता, यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. 14 जून रोजी त्यांचा गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह आढळला होता. लष्कराच्या 44 राष्ट्रीय रायफल्स (आरआर)चा जवान औरंगजेब पूंछच्या सबलारी सलानी मेंढरचा रहिवासी होता. 

 

जिला भेटायला जाणार होता, तिनेच दिली दहशतवाद्यांना टिप...

> एका इंग्रजी दैनिकाच्या रिपोर्टनुसार, औरंगजेब आणि त्याच्या मित्राने एक खासगी कार हायर केली होती. ड्रायव्हरला त्यांनी शोपियांला जाण्याचा आग्रह केला होता. परंतु दहशतवाद्यांकडून आधीच कारला इंटरसेप्ट केले जात होते. यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ओढून कारबाहेर खेचले आणि गोळ्यांनी चाळणी केली. वास्तविक, औरंगजेब ईदच्या निमित्ताने आपल्या घरी पूंछला जाणार होता, परंतु खोरे सोडल्यानंतर तो आधी एका स्थानिक महिलेची भेट घेणार होता. रिपोर्टनुसार, तो त्या महिलेशी अनेक दिवसांपासून संपर्कात होता.

> सैन्याच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दहशतवाद्यांना त्या महिला आणि औरंगजेबाच्या संबंधांबाबत माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी महिलेला औरंगजेबबद्दल माहिती देण्यासाठी मजबूर केले. मग त्या महिलेने दहशतवाद्यांना सांगून टाकले की, सूटीवर जाताना तो सर्वात आधी तिला भेटायला येणार आहे.

> यानंतर दहशतवादी औरंगजेब येण्याची वाट पाहू लागले. औरंगजेबची कार निश्चित स्थळी पोहोचताच दहशतवाद्यांनी बंदुकीच्या जोरावर त्याला कारबाहेर खेचले. यानंतर त्याची निर्घृण हत्या केली.

 

सैन्याने सर्व जवानांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना
> या घटनेनंतर सैन्याने आता आपल्या सर्व युनिट्सना एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यात कोणत्याही स्थानिक महिलेशी मैत्री न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सैन्याचे एक प्रवक्ते म्हणाले की, आमच्या जवानांसाठी सुडाने पेटलेल्या लोकांमध्ये काम करणे सोपे नाही, परंतु महिलांशी मैत्री करणे पूर्णपणे अनुचित आहे.

 

औरंगजेबने मोडले लष्कराचे नियम...

> औरंगजेबने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सचा आणखी एक नियम मोडला होता. वास्तविक, सैन्याच्या जवानांना कोणत्याही परिस्थिती प्रायव्हेट कारने फिरण्याची परवानगी नाही. त्यांना नेहमी बुलेट-प्रूफ कारमध्ये कुठेही यावे-जावे लागते. परंतु, औरंगजेब महिलेला भेटायला जाणार होता, यामुळे त्याने या नियमाचे उल्लंघन केले. यामुळे तो दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला. आता सैन्याने आपल्या जवानांना या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...