आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार बाेर्ड परीक्षा घाेटाळा : निकालापूर्वीच दहावीच्या ४२ हजार उत्तरपत्रिका शिपायाने रद्दीत विकल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोपाळगंज येथील भंगारविक्रेत्याने दिली व्यवहाराची कबुली. - Divya Marathi
गोपाळगंज येथील भंगारविक्रेत्याने दिली व्यवहाराची कबुली.

गोपाळगंज (बिहार)- गोपाळगंज येथील एस. एस. बालिका उच्च माध्यमिक विद्यालयातील गुण पडताळणी केंद्रातून ४२ हजार उत्तरपत्रिका गायब झाल्या होत्या. या उत्तरपत्रिका शाळेतील एका शिपायाने भंगारवाल्यास ८ रुपये किलो दराने विकल्या आहेत. शहरातील एका भंगारवाल्याची चौकशी केली असता त्याने याची कबुली दिली. त्याच्याकडे विशेष पोलिस पथकाने शनिवारी छापा टाकला होता. या छाप्यात पथकाने एक उत्तरपत्रिका जप्त केली आहे.    


पोलिस अधीक्षक रशीद जमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छठूसिंह याने ५ जून रोजी उत्तरपत्रिका स्ट्राँगरुममधून बाहेर काढल्या. या उत्तरपत्रिका ऑटोरिक्षातून भंगारवाल्याच्या दुकानापर्यंत नेण्यात आल्या. त्या आठ रुपये किलो दराने विकत घेतल्याची कबुली भंगारवाल्याने दिली. सर्व उत्तरपत्रिका लवकरच सापडतील, असा दावा एसआयटीने केला आहे. गावातील सुमारे ३०० भंगारवाल्यांची यादी पोलिसांकडे असून २६ दुकानांवर छापे टाकण्यात आले. आरोपी छठूसिंह यास अटक करण्यात आली. छठूसिंह व रात्रपाळीतील रक्षक आश पूजनसिंह यांच्या विरोधात १७ जून रोजी एफआयआर नोंंदविण्यात आला आहे. प्राचार्यांकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी सुरू आहे. कॉल डिटेल्स काढण्यात आले आहेत.  

 
टॉपर्सच्या उत्तरपत्रिका मागितल्या तर बोर्डाने मागितल्या तर समजले, उत्तरपत्रिका गायब
बिहारच्या बोर्डातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांची पुन्हा तपासणी करण्यात येणार होती. बिहार बोर्डाने एस. एस. बालिका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गुण पडताळणी केंद्रावर १५ जून रोजी दोन कर्मचारी पाठवले. बोर्डाने मागवलेल्या १२ उत्तरपत्रिका प्राचार्यांना देता आल्या नाहीत. १६ जून रोजी स्ट्राँगरुम उघडून तपासणी करण्यात आली. तेव्हा उत्तरपत्रिकांच्या २१३ बॅग गायब झाल्याचे समजले. बिहार बोर्डाने घाईघाईने प्राचार्य प्रमोद श्रीवास्तव यांना चौकशीसाठी पाटण्यास बाेलावले. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.


१४० रिकाम्या बॅगांतून मिळाले महत्त्वाचे पुरावे
उत्तरपत्रिका गायब झालेल्या नाहीत तर विकण्यात आल्या आहेत, अशी माहिती गुण पडताळणी केंद्राच्या चौकशीत एसआयटीला समजली. पथकाने सीवान आणि गोपाळगंजच्या भंगारवाल्यांकडे छापे टाकले. यावेळी हजियापूर येथील भंगार विक्रेता पप्पूकुमार गुप्ता व ऑटोचालक संजय यांना पकडले. पप्पूने सांगितले, संजय याने छठूशी बोलणी करुन दिली. त्यानंतर स्ट्राँगरुम उघडून ५ जून रोजी या एकाच दिवशी उत्तरपत्रिका काढून घेण्यात आल्या. एसआयटीला स्ट्राँगरुम मागे असलेल्या झाडीत १४० रिकाम्या बॅगा आढळल्या. त्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे उलगडत गेले. तंत्रज्ञान संशोधन पथकाचा तपासही भंगारवाल्याच्या दुकानापर्यंत जाऊन थांबला.

बातम्या आणखी आहेत...