आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ASSAULT: 13 वर्षांच्या मुलीवर 18 जणांचा बलात्कार; विद्यार्थी, शिक्षकांसह प्राचार्य देखील आरोपी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या अवघ्या 13 वर्षीय विद्यार्थीनीवर 18 जणांकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून बलात्कार होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये तिच्या शाळेच्या प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे. या सगळ्यांनी तिला ब्लॅकमेल करून तब्बल 7 महिने अत्याचार केला. या प्रकरणात प्रिन्सिपल आणि शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तसेच दोन शालेय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये या विद्यार्थिनीच्या वडिलांना तुरुंगवास झाला होता. तेव्हापासून हे सगळे तिला ब्लॅकमेल करून अत्याचार करत होते असे पोलिसांनी स्पष्ट केले. 


आधी विद्यार्थी, मग शिक्षक आणि प्रिन्सिपल सुद्धा...

> बिहारच्या छपरा जिल्ह्यात 8 व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पोलिसांकडे 18 जणांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांना तिने या सर्व 18 जणांचा यादी सोपविली. त्यामध्ये प्रिन्सिपल आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे.
> पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2017 मध्ये तिच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. याच महिन्यात तिच्यासोबत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिची अब्रू लुटली. आरोपी विद्यार्थ्याने हा प्रकार आपल्या शाळेतील इतर मित्रांना सांगितला. 
> काही दिवसांतच विद्यार्थी तिला ब्लॅकमेल करायला लागले आणि एक-एक करून आणखी 4 ते 5 विद्यार्थ्यांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती जेव्हा शिक्षकांना मिळाली तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांवर कुठलीही कारवाई केली नाही. त्यांनी सुद्धा या मुलीवर बलात्कार केला. 
> विद्यार्थ्यांनंतर शिक्षकांमध्ये सुद्धा या मुलीची माहिती मिळाली. त्यांनी सुद्धा या मुलीला धमकावून आणि ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार सुरू केला. एवढेच नव्हे, तर ही गोष्टा प्रिन्सिपलच्या कानावर गेली तेव्हा त्याने सुद्धा या विद्यार्थिनीचे लचके तोडले. 


वडिल तुरुंगातून आले तेव्हा...
हे सगळे एक-एक करून तिच्यावर गेल्या 7 महिन्यांपासून अत्याचार करत होते. नुकतेच तिच्या वडिलांची तुरुंगातून सुटका झाली. तेव्हा तिने हा प्रकार त्यांना सांगितला आणि त्यांनी पोलिस स्टेशन गाठले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळेचा प्रिन्सिपल आणि एका शिक्षकाला अटक केली. तसेच यादीत समाविष्ट असलेल्या 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतले. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सोबतच, पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तिच्यावर उपचार आणि चाचण्यांसाठी एक विशेष वैद्यकीय समिती स्थापित करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...