आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Congress Leaders Are Tapping Phones: Karnataka Home Minister Reddy\'s Allegation

भाजप काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप करतोय, कर्नाटकचे गृहमंत्री रेड्डी यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - काँग्रेस नेते व पक्षाच्या समर्थकांचे फाइन टॅप करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे, असा आरोप कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंगम रेड्डी यांनी केला आहे. दिल्ली, गुजरात, राजस्थानमध्ये बसलेली भाजप नेत्यांची टीम फोन टॅप करण्याचे काम करत आहे.  


राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षीय कामगिरी चांगली राहणार नाही, असे भाजपला समजून आले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी यासंबंधीचा अहवालाचा अभ्यास केला. त्यात पक्षाची कामगिरी लक्षात आली. त्यामुळे भाजपने विरोधकांवर आयकर विभागाद्वारे छापण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपासून ही कारवाई सुरू आहे. भाजप काँग्रेसच्या रणनीती वरून वाटचाल करते. काँग्रेस निवडणुकीच्या स्पर्धेत भाजपच्या तुलनेत आघाडीवर आहे. राज्यात १२ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात काँग्रेसला बहुमत मिळेल, असा दावा रेड्डी यांनी केला आहे. काँग्रेसशी चांगले संबंध असलेल्या व्यापाऱ्यावर आयकराच्या धाडी टाकण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.  रेड्डी म्हणाले, भाजपने अंतर्गत पातळीवर केलेल्या पाहणी नंतर ही योजना आखली.

पाहणीत भाजपला २२४सदस्यीय विधानसभेत ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. 

 

३ हजार २२६ उमेदवार आता रिंगणात 
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर मुलबागल (सुरक्षित) मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तथा आमदार मंजू नाथ यांच्यासह एकूण २२७ उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री जारी करण्यात आलेल्या आकड्यानुसार आता एकूण ३ हजार २२६ उमेदवार मैदानात आहेत. गत निवडणुकीत त्यांनी दाखल केलेले जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज रद्द केला होता.  

 

बातम्या आणखी आहेत...