आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राहुलपेक्षा अखिलेश जास्त समजूतदार’; काश्मीरसंबंधी विधानाचा भाजप नेत्याकडून समाचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंडा- सिंगापूरमध्ये काश्मीरबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार बृजभूषण सिंह यांनी टीका केली आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षांकडून जबाबदारपूर्ण विधानाची देश मुळीच अपेक्षा ठेवत नाही. राहुल यांच्या तुलनेत अखिलेश समजदार वाटतात, असे सिंह यांनी सांगितले.  


गोंडा महोत्सवाच्या निमित्ताने सहभागी बृजभूषण यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. राहुल यांनी काश्मीरबद्दल केलेले वक्तव्य त्यांची अपरिपक्वता दर्शवणारे होते. गांधी यांना भलेही काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, परंतु ते अजून परिपक्व झालेले नाहीत. राहुल यांच्या तुलनेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव जास्त परिपक्व वाटतात. काश्मीरची समस्या काँग्रेसमुळे निर्माण झालेली आहे. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे आज काश्मीरची ही परिस्थिती आहे., असा आरोपही सिंह यांनी केला.आहे. 

 

पोटनिवडणुकीतील आघाडी नाइलाजातून जन्मलेली  
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत सपा व बसप यांच्यात आघाडी झाली आहे. परंतु ती नाइलाजास्तव झालेली आघाडी आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याला घाबरून दोन्ही पक्षांनी ही तडजोड केली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय होईल. त्यानंतर आघाडीत आपोआपच बिघाडी झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावा सिंह यांनी केला.  

 

बातम्या आणखी आहेत...