आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरामध्ये BJP सरकार स्थापन करणार, अमित शहांचा दावा; भागवतांच्या वक्तव्यावर भाजपाध्यक्षांचे मौन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अगरतळा - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषद घेतली. शहांनी दावा केला की त्रिपुरामधील जनतेला आता बदल हवा आहे. ते बदलासाठी तयार आहेत. राज्यात भाजप सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान 
- त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. 20 वर्षांपासून येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आहे. 
- शहा म्हणाले, पूर्वोत्तरमध्ये आम्ही सबका साथ-सबका विकास या घोषणेसह पुढे निघालो आहोत.
- काँग्रेसवर टीका करताना शहा म्हणाले, येथे सिंडिकेट वरचढ आहेत. सीपीएमला विजयी करण्यात काँग्रेसचा मोठा हात आहे. काँग्रेस मतविभाजनाचे काम करत असतात. 
- भाजपची निवडणूक रणनिती सांगताना शहा म्हणाले, 'प्रत्येक बूथ, प्रत्येक पोलिंग स्टेशनवर भाजपचे कार्यकर्ते राहातील. त्रिपुराची जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. आम्ही प्रत्येक घरात रोजगार देऊ. ट्रान्सपोर्टसाठी लॉजिस्टिक हब तयार करु.'
- त्रिपुरामध्ये सध्याची स्थिती अतिशय वाईट आहे. 

 

एवढे दहशतवादी कधी मारले गेले नाही
- शहा म्हणाले, भाजप सरकारच्या काळात जेवढे दहशतवादी मारले गेले तेवढे आजपर्यंत कधी मारले गेले नाही. 

 

भागवतांच्या वक्तव्यावर मौन 
- रास्वसंघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी शहांना विचारले असता ते काय म्हणाले हे माहित नाही, असे सांगत शहांनी उत्तर देण्याचे टाळले. 
- सरसंघचालक मोहन भागवत 11 फेब्रुवारीला मुझफ्फरपुर येथे म्हणाले की जर देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली तर संघाचे स्वंयसेवक सीमारेषेवर लढण्यासही सज्ज आहे. जिथे लष्कराला सैनिक तयार करण्यासाठी 6ते7 महिने लागतात तिथे संघ फक्त 3 दिवसांमध्ये संघाचे स्वंयसेवक सैनिक म्हणून लढू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...