आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: \'चाणक्य\' शहांनी कर्नाटक विजयासाठी \'हा\' फॉर्म्युला वापरला BJP President Amit Shah Uses This Magic In Karnataka For Victory

\'चाणक्य\' शहांनी कर्नाटक विजयासाठी वापरला \'हा\' फॉर्म्युला, BJPला मिळवून दिला 15वा विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / बंगळुरू-  कर्नाटकात पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले. या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडेच जाते. पीएम नरेंद्र मोदी यांनी याआधीच शहा यांचे कौतुक करत म्हटले होते की- प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना आदर्श म्हणून पाहिले पाहिजे. आता जाणून घेऊ, शहा यांनी कर्नाटकात असे काय केले, की भाजपला बहुमताजवळ जाता आले. अमित शहा यांच्या नेतृत्वातील हा 15वा विजय ठरला आहे.  


हाफ-पेज इंचार्जचा नवा फॉर्म्युला

2014 पासून अमित शहा भाजपला नेत्रदीपक विजय मिळवून देत आले आहेत. बिहार-पंजाब वगळता इतर राज्यांत भाजप थेट सत्तेपर्यंत पोहोचली. यामागे पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शहा यांनी पेज इंचार्ज आणि बूथ मॅनेजमेंटचा नवा फॉर्म्युला दिला. या दोन शब्दांचा अर्थ भाजपशिवाय इतर कोणत्याही पक्षाने यापूर्वी आपापल्या कार्यकर्त्यांना एवढ्या प्रभावी पद्धतीने समजावून सांगितला नव्हता. 

तथापि, कर्नाटकात अमित शहा यांनी नवी खेळी खेळली, ती होती हाफ पेज इंचार्ज. म्हणजेच एका पेज इंचार्जखाली एक व्यक्ती. जो त्या पेजवरील मतदारांकडे लक्ष देईल. असे सांगितले जाते की, शहा यांनी कर्नाटकात 10 लाख हाफ पेज इंचार्ज बनवले होते. एका हाफ पेज इंचार्जवर 50 जणांना भाजपच्या समर्थनासाठी बूथपर्यंत आणण्याची जबाबदारी होती.

 

पेज इंचार्ज म्हणजे काय?
वास्तविक, प्रत्येक पोलिंग बूथमध्ये मतदार यादी असते. या मतदार यादीकडे सामान्यपणे पाहिल्यास 17-18 पेज असताता. आणि जाहीर गोष्ट आहे की, या पेजेसमध्ये मतदारांचे नाव असते. पेज इंचार्जचे काम या पानावर नोंदलेल्या मतदारांपैकी 60 मतदारांवर लक्ष केंद्रित करणे. म्हणजेच पेज इंचार्ज 60 मतदारांच्या थेट संपर्कात असतो. आणि त्यांना भाजपच्या बाजूने मतदान करायला लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवतो.


या आकडेवारीवरून पाहा कर्नाटकात शहा यांनी काय केले?
- अमित शहा यांनी कर्नाटकात एकूण 34 दिवस घालवले.
- त्यांनी 57,135 किलोमीटरचा प्रवास केला.
- कर्नाटकसाठी 28 जिल्ह्यांना समान वेळ दिला.
- शहा यांनी पूर्ण राज्यात 59 रॅलीज केल्या आणि 25 रोड शोच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
- शहा यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचार अभियानाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती.

 

रणांगणात मोठ्या नेत्यांची फौज
शहा यांनी स्वत: जाऊन पूर्ण कर्नाटकात कार्यकर्त्यांचा जोश वाढवला आणि पूर्ण केंद्रीय नेत्यांना येथे आणले. पूर्ण देशभरातून पक्षाच्या 500 खासदार-आमदारांनी प्रचार केला. सध्या 21 राज्यांत आपली सत्ता आणणाऱ्या भाजपने पक्षाच्या 10 मुख्यमंत्र्यांना येथे प्रचारासाठी उतरवले. सर्वात जास्त मागणी यूपीचे सीएम आदित्यनाथ यांना होती. सूत्रांनुसार, योगी यांनी 33 मतदारसंघांत प्रचारसभा घेतल्या आणि भाजपने त्या जागांवर उत्तम कामगिरी केल्याचे आढळले आहे.

 

लिंगायत मतांना केले आकर्षित
काँग्रेसने निवडणुकीच्या ठीक आधी लिंगायत कार्ड काढले, परंतु शहा यांनी आपल्या रणनीतीने ते निष्प्रभ ठरवले. लिंगायतांचे समर्थन मिळवण्यासाठी एकानंतर एक अनेक मठांमध्ये ते गेले. कर्नाटकात काँग्रेसचा चेहरा सिद्धरमय्या यांना अँटी-हिंदू सिद्ध करण्यासाठी सातत्याने शाब्दिक हल्ले केले. यामुळे लिंगायत मतदार भाजपसोबत राहण्यास मदत मिळाली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कर्नाटक निकालासंंबंधित इतर इन्फोग्राफिक्स... 

 

बातम्या आणखी आहेत...