आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कर्नाटकात दोन्ही पक्षांचा सारखाच जाहीरनामा: काँग्रेस तरुणांना, तर भाजप गरीब महिलांना देणार स्मार्टफोन BJP Releases Manifesto For Karnataka Assembly Election In Bengaluru News And Updates

मोफत स्मार्टफोन, लॅपटॉप, गोहत्या रोखू; कर्नाटक निवडणुकीत भाजपचा जाहीरनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणूक एक आठवड्यावर असतानाच भाजपने शुक्रवारी आपला जाहीरनामा जाहीर केला. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पक्षाच्या आश्वासनांची यादी सांगितली. त्यात शेतकरी कर्जमाफी, उपवधूंना मंगळसूत्र, दारिद्र्यरेषेखालील महिलांना स्मार्टफोन, विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जाणार आहे. गोहत्या रोखणे व मंदिर-मठांसाठी निधीचे आश्वासन आहे. जाहीरनाम्यामुळे ३-४ टक्के मतांचा टक्का वाढेल, असे येदियुरप्पांना वाटते. 

 

 

जाहीरनाम्यातील ६ मुद्दे  

- गोहत्या रोखण्याचा कार्यक्रम चालवला जाणार. ३००० कोटींची तरतूद.  
- मंदिर व मठांच्या विकासासाठी ५०० कोटी  रुपयांची तरतूद करण्याचे जाहीर.  
- नोकऱ्यांसाठी २५० कोटी रुपये. प्रत्येक तालुक्यात रनिंग ट्रॅक, जलतरण तलाव.  
- ३०० हून जास्त अन्नपूर्णा कँटीन. ४०० मागासवर्गीय मुलांना परदेशात शिक्षण.  
- आेबीसी जातींच्या लोकांसाठी सुविधा घर. ७५०० कोटींच्या निधीची तरतूद.  
- चोवीस तास भ्रष्टाचार प्रतिबंधक हेल्पलाइन.  

 

कनार्टकात शेतकऱ्यांची 21% लोकसंख्या, यामुळे दोन्ही पक्षांची एकसारखी वचने

  काँग्रेसची वचने भाजपची वचने
शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, कृषी कॉरिडॉर बनवणार 1 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकऱ्यांचे वेगळे कृषी बजेट
सिंचन 5 वर्षांत सिंचनासाठी 1.25 लाख कोटी खर्च करणार प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी 1.50 लाख कोटी रुपये खर्च करणार
महिला सरकारी कॉलेजेसमध्ये विद्यार्थिनींना मोफत सैनेटरी नैपकिन दारिद्र्य रेषेखालील महिला आणि मुलींना मोफत सैनेटरी नैपकिन
महिला रोजगार सरकारी वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग 50% वाढवणार महिलांना स्वयंरोजगारासाठी स्त्री उन्नति स्टोअर उघडण्यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च करणार
महिला सुरक्षा महिला पोलिस फोर्स 33% पर्यंत वाढवणार महिलांविरुद्ध गुन्ह्यांच्या लंबित प्रकरणांच्या चौकशीसाठी 1000 महिला पोलिसांची भरती करणार
स्मार्टफोन कॉलेजमध्ये जाणाऱ्या 18 ते 23 वर्षांच्या तरुणांना मोफत स्मार्टफोन गरीब महिलांना मोफत स्मार्टफोन, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मोफत लॅपटॉपही
नोकऱ्या 5 वर्षांत 1 कोटी रोजगार उपलब्ध करणार स्टार्टअप संस्कृतीसाठी बंगळुरू आणि हुबळीसहित 6 शहरांमध्ये ‘6 के-हब’ची निर्मिती करणार

 

कर्नाटक निवडणुकीचे गणित

एकूण जागा: 224

बहुमत: 113

मतदार: 4.90 कोटी

 

तारीख

निवडणुकीचे वेळापत्रक
17 एप्रिल अधिसूचना जारी होईल.
24 एप्रिल नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख.
25 एप्रिल नामांकनांची छाननी.
27 एप्रिल नामांकन परत घेण्याची शेवटची तारीख.
12 मे मतदान
15 मे निकाल

 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी माहिती... 

बातम्या आणखी आहेत...