आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप, रा.स्व. संघ ‘हिंदू कट्टरवादी’: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदू कट्टरवादी असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केली आहे. परंतु फुटीरवाद्यांना काँग्रेसच पाठिंबा देते, असा प्रतिहल्ला भाजपने केला आहे. मात्र दोषी आढळून येत असल्यास अटक करून दाखवा, असे आव्हान भाजपने सिद्धरमय्यांना दिले.  


भाजप आणि संघ दहशतवादी असल्याचा आरोप सिद्धरमय्या यांनी बुधवारी केला होता. माझे म्हणणे हिंदुत्व कट्टरवादाबद्दल होते. गुरुवारी चामराजनगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. म्हैसूरमध्ये मात्र त्यांनी थेट हल्ला चढवला. हिंदुत्व दहशतवाद्यांबद्दल बोलत होतो. मीदेखील हिंदू आहे. परंतु मानवतेसोबत माझे हिंदुत्व आहे. त्यांचे (भाजप) हिंदुत्व मानवतेशिवाय आहे.  हाच त्यांचा व माझ्यातील फरक आहे. 

 
मग मला कधी अटक करणार ? 

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतो. मग मला मुुख्यममंत्री कधी अटक करणार ?, अशी विचारणा भाजपचे आमदार सुरेश कुमार यांनी केली. केंद्राने फाेन टॅप केले - रेड्डी  : केंद्रातील सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांचे फोन टॅप केले आहेत. कर्नाटकातील अनेक जणांचे फोन टॅप झाल्याचे मी सुरुवातीपासून सांगत आलो आहे. आपण त्याबाबतीत सावध असले पाहिजे. कायद्यानुसार ही कृती चुकीची आहे, असा आरोप कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी केला आहे.  

 

बेजबाबदार वक्तव्य  
सिद्धरमय्या यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे. भाजपची बांधणी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झाली. मात्र काँग्रेसच्या आरोपात तथ्य नाही, असा दावा भाजपच्या खासदार शाेभा करंडलजे यांनी केला. केवळ काश्मीरमध्येे दहशतवादी कारवाया होतात. त्यासाठी काँग्रेस कारणीभूत आहे. खलिस्तान चळवळीत काँग्रेसची अशीच भूमिका होती. त्यात अनेक अधिकारी, सैनिकांना प्राण गमवावा लागला होता.  

बातम्या आणखी आहेत...