आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने मिशन-2019 साठी फुंकले रणशिंग, हरियाणातून महा बाइक रॅलीने अमित शहा करणार सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिंद (हरियाणा) : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुरुवारी हरियाणात एक रॅली करून पक्षाच्या मिशन-2019 ची घोषणा करतील. बुधवारीच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर बिना नंबरच्या बाइकवरून भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या बाइक रॅलीचा बंदोबस्त पाहण्यासाठी जिंद येथे पोहोचले. म्हणाले की, विरोधी पक्षांकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रॅलीला होत असलेल्या विरोधाला काही अर्थ नाही. 

 

विरोधकांकडून होत असलेला विरोध अप्रासंगिक..

बाइक रॅलीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येथे आलेल्या खट्टर यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘‘आपण लोकशाही असलेल्या देशातील नागरिक आहोत. येथे सर्वांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ज्या प्रकारे रॅलीला विरोध होत आहे, तो अप्रासंगिक आहे.’’ खट्टर रॅलीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले खरे, परंतु तेथे एक नवा वाद उभा राहिला. खट्टर ज्या बाइकवरून रॅलीच्या स्थळावर पोहोचले, त्या नंबरच नव्हता. खट्टर हेलिपॅडवरून बुलेट चालवून रॅलीच्या स्थळावर पोहोचले, तथापि त्यांनी त्या वेळी हेल्मेट घातलेले होते.

 

जाट नेत्यांसोबत बैठकीनंतर सीएम खट्टर यांचा निर्णय, 2016 मध्ये दाखल हिंसेचे सर्व खटले परत...

पत्रकारांनी जेव्हा खट्टर यांना विचारले की, ही रॅली आगामी निवडणुकीचा शंखनाद आहे का, तेव्हा ते म्हणाले की, भाजपला निवडणुकीच्या तयारीची आवश्यकता नाही. आम्ही कोणत्याही वेळी निवडणुकीसाठी तयार आहोत. अमित शहा यांचा हा दौरा ऐतिहासिक असणार आहे. ते म्हणाले की, ही आपल्या राज्यातील अशी पहिली यात्रा असेल जेव्हा लाखो लोक बाइकवरून रॅली स्थळावर पोहोचतील. 

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला म्हणाले की, शाह गुरुवारी जिंदच्या जवळ पिंडारा गावात एका बाइक रॅलीला संबोधित करतील. भाजप मिशन 2019 साठी जिंद येथून प्रचाराचा नारळ फोडणार आहे. या महारॅलीसाठीची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे.

बातम्या आणखी आहेत...