आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 मध्ये पुन्हा BJP आल्यास भारत 'हिंदू पाकिस्तान' होईल, राज्यघटना बदलली जाईल -थरुर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलली जाईल आणि भारताचे हिंदू पाकिस्तान होईल असा दावा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केला आहे. भारताच्या राज्यघटनेचा त्याग करावा हीच संघ परिवारातील विचारकांची इच्छा आहे. तिरुअनंतपुरम येथे काँग्रेस खासदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, "भाजप सरकारला मोठा बदल करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल. यासाठी त्यांना लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत आवश्यक आहे. लोकसभेत एनडीए घटकपक्षांसहित विचार केल्यास त्यांच्याकडे विशेष बहुमत आहे. निम्म्याहून अधिक राज्यांत त्यांची (भाजप) सत्ता आहे. अशात त्यांना आता केवळ राज्यसभेत बहुमत मिळवायचे आहे. पुढील 4 ते 5 वर्षांत तेही मिळू शकते."


हिंदू राष्ट्रासाठी नवीन राज्यघटना आणणार भाजप
थरुर म्हणाले, "भाजपने एकदाचे दोन तृतियांश बहुमत मिळवले की ते राज्यघटनेला तुडवून फेकतील आणि नवीन राज्यघटना लागू करतील. त्यांची ही नवीन राज्यघटना हिंदू राष्ट्राशी अनुकूल राहील. ते अल्पसंख्याकांना असलेले समानतेचे अधिकार हिरावून घेतील. यानंतर भारत एक ‘हिंदू पाकिस्तान’ बनेल. गांधी, नेहरू स्वातंत्र्य सैनिक ज्या भारतासाठी झटले तो भारत राहणाच नाही."


भाजप म्हणे, काँग्रेस निर्लज्ज
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी वेळीच आपल्या पक्षाची प्रतिक्रिया जाहीर करत थरुर आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. पात्रा म्हणाले, "थरुर म्हणतात 2019 मध्ये भाजपची सत्ता आली तर भारताचे हिंदू पाकिस्तान होईल. निर्लज्ज काँग्रेस भारताला कुप्रसिद्ध करताना आणि हिंदूंचा अपमान करताना कुठलीच संधी सोडत नाही. हिंदू दहशतवादपासून ते हिंदू पाकिस्तान पर्यंत विधाने करून पाकिस्तानींना खुश करणाऱ्या काँग्रेसच्या विधानांची तुलनाच करता येणार नाही."

बातम्या आणखी आहेत...