आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: BJP Youth Leader Semi Nude Photos With Foreign Girls Gone Viral Political Earthquake

Shocking: भाजप नेत्याचे विदेशी तरुणींसोबत अर्धनग्न फोटोज व्हायरल, भाजपने केली हकालपट्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातेत भारतीय जनता पक्षाच्या एका तरुण नेत्याचे विदेशी तरुणींसोबतचे अर्धनग्न फोटोज व्हायरल झाले आहेत. रविवारी (1 जुलै) सोशल मीडियावर हे बीभत्स फोटोज व्हायरल झाल्यानंतर पक्षात नव्या वादाला सुरुवात झाली. भाजपसमोर जेव्हा हे प्रकरण आले, तेव्हा सोमवारी त्यांनी यापासून अंतर राखले. स्पष्टीकरण दिले की, पक्षाच्या सुरेंद्रनगर जिल्हा समितीने म्हटले आहे की, दीपक वनियाला चारित्र्य चांगले नसल्याने मागच्याच महिन्यात बरखास्त केले होते.

 

19 जूनपासून वनिया तुरुंगात

वनिया हा भाजप युवा मोर्चाच्या वाधवान शहर सचिवपदी होता. पोलिसांवर हल्ला करणे, दंगे भडकावणे या प्रकरणांत तो तुरुंगात आहे. सर्वात आधी वनियाचे वादग्रस्त फोटोज गर्वी गुजरात, बीजेपी गुजरात या नावांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाले होते. हा ग्रुप सुरेंद्रनगरचे चिराग पटेल चालवतात. ते स्वत:ला भाजप समर्थक सांगतात. ते म्हणाले की, शनिवारी वनियाने स्वत:हूनच ग्रुपवर हे फोटोज शेअर केले होते.

लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. या घटनेमुळे राजकीय भूकंप आला आहे. दरम्यान, वाढवान भाजप व्हॉट्सअॅप ग्रुप (गरवी गुजरात बीजेपी) मध्ये विविध महिलांसोबत हे अश्लील फोटोज व्हायरल झाले आहेत. वढवाण शहराचा भाजप युवा मोर्चा मंत्री दीपक वानिया या ग्रुपचा मेंबर आहे. 

 

वनियाने स्वत: शेअर केले अश्लील फोटोज...

चिराग पूर्वी पाटीदार अनामत आंदोलन समितिच्या हार्दिक पटेल सोबत होते. ते म्हणाले की, “मी शहराबाहेर होतो. मला याबाबत रविवारी माहिती मिळाली. वनियानेच त्यांना शेअर केले होते. एवढेच नाही, तर त्याने हे फोटोज आपले प्रोफाइल फोटोज म्हणून वापरले होते. ग्रुपमध्ये एकूण 200 नेते जोडलेले आहेत. त्यापैकीच वनिया आहे.” तथापि, चिराग म्हणाले की, त्यांना वनिया तुरुंगात असल्याची माहिती नव्हती. परंतु हे फोटोज वनियाच्या नंबरवरूनच शेअर करण्यात आले.

 

भाजपने केली हकालपट्टी

वनियाला 19 जून रोजी अटक झाली होती. पोलिसांनी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली असता वनियाने पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. तेव्हा त्याने चिथावणीखोर वक्तव्य करून दंगे भडकावण्याचा प्रयत्नही केल्याचा आरोप होत आहे. पक्षाचे सुरेंद्रनगर जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप पटेल म्हणाले, “वनियाच्या कॅरेक्टरबाबत माहिती मिळाल्यानंतर 3 महिन्यांपूर्वी त्याला मौखिक इशारा देऊन बरखास्त करण्यात आले होते. आता पुढे त्याविरुद्ध पुरावे मिळाल्याने 21 जून रोजी पक्षातून अधिकृतरीत्या काढून टाकण्यात आले आहे. यामुळे या वादग्रस्त फोटोंशी आमचे काहीही देणे-घेणे नाही.” 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, भाजप नेत्याचे विदेशी तरुणींसोबत व्हायरल झालेले काही Photos... 

बातम्या आणखी आहेत...