आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येपूर्वी विद्यार्थीनीने मैत्रीणीला केला मेसेज, म्हणाली- आता जगण्याची इच्छा नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंजिनिअंरिंची विद्यार्थीनी महिमा पिरहारने आत्महत्या केली.... - Divya Marathi
इंजिनिअंरिंची विद्यार्थीनी महिमा पिरहारने आत्महत्या केली....

भोपाळ- बैतूल जिल्ह्यात इंजीनिअरिंगच्या विद्यार्थीनीने ब्लॅकमेलिंगला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी तिने आपल्या मैत्रीनीला मेसेज करून आयुष्याला कंटाळली असल्याचे सांगितले होते. नातेवाईकांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला. गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला.


मैत्रीणीला केला होता मेसेज...
- नातेवाईकांनी विद्यार्थीनीच्या क्लासमेटवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. मृत विद्यार्थीनी महिमा बालाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात बीईची विद्यार्थीनी होती.
- आभ्यासत अतिशय हुशार असलेली महिमा मुलांना ट्यूशन शिकवून स्वत:चा खर्च उचलत होती. काल रात्री तिने आपल्या मैत्रीणीला मेसेज करून आता जगण्याची इच्छा नाही असे सांगितले होते. हा मेसेज मिळाल्याची माहिती मैत्रीनीने तिच्या कुटुंबीयांना दिली.
- यानंतर रात्री 9 वाजता नातेवाइकांनी तिच्या शोध घेण्यास सुरूवात केली. रात्रीपासून मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर गुरूवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवर महिमाचा मृतदेह आढळून आला.
- नातवाईकांनी आरोप केला आहे की, महिमाला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यासोबत शिकणारा विद्यार्थी श्रेयांस त्रास देत होता. तो तिचे फोटो कुटुंबीयांना दाखवणे आमि तिच्या घरी येण्याची धमकी देत होता. यामुले विद्यार्थीनी अतिशय घाबलेली होती, तो तिला ब्लॅकमेल करत होता.


- पोलिसांना माहिमा परिहारच्या फोनमध्ये श्रेयांश नावाच्या तरूणाचे काही संशयस्पद मेसेज मिळाले आहेत, यात विद्यार्थीनी त्याला त्रास न देण्याची विनंती करत आहे.
- महिमाच्या एका नातेवाइकाने त्या तरूणाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. कॉलेजमध्ये देखील या विषयावरून वाद होत होता. याची माहिती कॉलेज व्यवस्थापनाला देखील होती असे सांगण्यात येत आहे. आता मृत महिमाचे नातवेईक आरोपी विद्यार्थ्याविरोधात कारवाईची मागणी करत आहे.
- पोलिस अधिकारी शेख मकसूद खान यांनी सांगितले की, रेल्वे ट्रॅकवर महिमा परिहार (19)चा मृतदेह आढळून आला आहे. नातेवाइकांनी एका तरूणावर महिमाला छळल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसानी तपास सुरू केला आहे.


पुढील स्लाइडवर वाचा, आरोपी विद्यार्थ्याने महिमाला केलेले संशयास्पद मेसेज...

बातम्या आणखी आहेत...