आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोधगया ब्लास्ट : 5 वर्षांनी निकाल, सर्व 5 आरोपी दोषी; 30 मिनिटात झाले होते 9 स्फोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 जुलै 2013 च्या सकाळी साडे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान महाबोधी मंदिरात एकापाठोपाठ नऊ स्फोट झाले होते. - फाइल - Divya Marathi
7 जुलै 2013 च्या सकाळी साडे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान महाबोधी मंदिरात एकापाठोपाठ नऊ स्फोट झाले होते. - फाइल

बोधगया ​ (बिहार) - बोधगया सीरियल ब्लास्ट प्रकरणात चार वर्षे 10 महिने आणि 12 दिवसांनी शुक्रवारी एनआयए कोर्टाने सर्व पाच आरोपींना दोषी ठरवले. त्यांनी 7 जुलै 2013 ला शहरात 30 मिनिटांत 9 स्फोट घडवले होते. त्यामध्ये एक तिबेटी बौद्ध भिक्षु आणि म्यानमारचे भाविक जखमी झाले   होते. पाटणा सिव्हील कोर्टात 2013 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एनआयए कोर्टाचा हा पहिला निर्णय आहे. बोधगया ब्लास्ट प्रकरणात एनआयएने 90 साक्षीदार सादर केले होते. 


11 मे रोजी संपला युक्तीवाद 
- कोर्टाने 11 मे 2018 ला दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर निर्णय 25 मेपर्यंत राखीव ठेवला होता. या सिरियल ब्लास्टचा म्होरक्या हैदर अली उर्फ ब्लॅक ब्युटी होता. त्याच्याबरोबर इम्तियाज अन्सारी, उमर सिद्दीकी, अझरुद्दीन कुरैशी आणि मुजीबुल्लाह अन्सारी होते. हे सर्व बेऊर तुरुंगात आहेत. 
- निर्णयापूर्वी बेऊर तुरुंगाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. एनआयएने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सर्व आरोपींवर 3 जून, 2014 ला चार्जशीट दाखल केले होते. 


बौद्धभिक्षू बनून मंदिरात केला होता प्रवेश 
- हैदर अली :
रांचीच्या डोरंडा ठाण्यातील हाथीखाना येथील राहणारा आहे. 2014 पासून ते बेऊर जेलमध्ये कैदेत आहे. हाच म्होरक्या आहे. त्याने बौद्ध भिक्षू बनून स्फोट घडवला होता. त्याने त्याठिकाणी पाच वेळा रेकी केली होती. 
- इम्तियाज अन्सारी : रांचीच्या ध्रुवा सिटीयोंचा राहणारा आहे. 2013 पासून तो तुरुंगात कैदेत आहे. ब्लास्टमध्ये याने हैदरची साथ दिली होती. त्यादिवशीही तो आला होता. 
- मुजीबुल्लाह अन्सारी: रांचीच्या ओरमांझीमधील चकला गावचा रहिवासी. 2014 पासून बेऊर तुरुंगात कैदेत आहे. 
- उमर सिद्दीकी : छत्तीसगढच्या रायपूरमधील राजा तलाव परिसरातील नुराणी चौकातील रहिवासी आहे. 2013 पासून तुरुंगात कैदेत आहे. त्याच्याच घरी ब्लास्टची योजना तयार करण्यात आली होती. 
- अझहर कुरैशी : छत्तीसगडच्या रायपूरमधील राजा तलाव परिसरातील नव्यी वस्तीत राहणारा आहे. 2013 पासून कोर्टात कैदेत आहे. बोधगयामध्ये ब्लास्ट करण्याचा कट आखण्यात त्याचा समावेश होता. 

 

रायपूरमध्ये रचला होता कट, ब्लास्टपूर्वी पाच वेळा रेकी 
स्फोट करण्यासाठी हैदरने रायपूरमध्ये राहणारा सिमीचा सदस्य उमर सिद्दीकी याच्याशी संपर्क केला होता. हैदर रायपूरला गेला होता. त्याचठिकाणी बोधगया ब्लास्टचा कट रचण्यात आला होता. राजा तलाव येथील एका घरात जिहादच्या नावाखाली हैदरचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. हैदरला स्फोटाचे साहित्यही त्याचठिकाणी देण्यात आले होते. हैदरने ब्लास्टपूर्वी बोधगयाचा चार-पाच दिवसांचा दौरा करून त्याठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला होता. हैदर आणि त्याचे सहकारी सिमिचे सदस्य होते. हैदरने बौद्ध भिक्षू बनून मंदिरात प्रवेश करून स्फोट घडवला होता. 

बातम्या आणखी आहेत...