आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • प्रेयसीची हत्या करून 3 दिवस लपवून ठेवला मृतदेह, बॅगमध्ये भरून लावली विल्हेवाट Boyfreind Murdered His Girlfreind

प्रेयसीची हत्या करून 3 दिवस लपवून ठेवला मृतदेह, विल्हेवाट लावताना फुटली खुनाचा वाचा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - बुधवारी शहरातील वंदना एन्क्लेव्ह कॉलोनीतील एका कारमध्ये बॅगच्या आत मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी खुलासा केला आहे. सूत्रांनुसार, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीचे नाव ज्योती वर्मा असून ती लुधियानाची रहिवासी होती. आरोपीचे नाव शिवम आहे. त्याने प्रेमजालात ओढून तिला फसवून गाझियाबादला नेले होते. आधी तो लग्नासाठी तयार होता, परंतु नंतर चारित्र्यावरील संशयामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध मर्डर आणि मृतदेह लपवून ठेवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण
- SSP वैभव कृष्ण म्हणाले, शिवम विधी आणि मृत ज्योती वर्मा नेहरू गार्डन परिसरातील वंदना एन्क्लेव्हमध्ये किरायाने मागच्या 5-6 महिन्यांपासून राहत होते. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्या घरातून 2 दिवसांपासून प्रचंड दुर्गंधी येत होती. यावर शेजाऱ्यांनी मंगळवारी शिवमला चौकशी केली, त्याने उंदीर मरून पडल्याचा संशय व्यक्त करून स्वच्छता करणार असल्याचे म्हणाला.
- रात्री त्याने सेल्फ ड्राइव्ह कॅब बुक केली. ज्योतीचा मृतदेह बॅगमध्ये भरून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला. परंतु प्रचंड दुर्गंधीमुळे शेजारी बाहेर आले आणि त्यांनी त्याला रोखले.

 

मैत्रिणीच्या लग्नात झाली होती भेट
- शहरातील फतेहपूरच्या रहिवासी ज्योतीला 4 बहिणी आणि 2 भाऊ आहेत. ज्योतीची शिवमशी भेट एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. याशिवाय सर्व बहिणींचे लग्न झालेले होते आणि तीच घरखर्च उचलत होती. तिची मोठी बहीण म्हणाली की, त्यांच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. ज्योतीने स्वत: मोठी बहीण आणि छोट्या बहिणीलाही ब्यूटी पार्लरचा कोर्स करायला लावला होता. मग दोन्ही बहिणी जॉब करू लागल्या होत्या.

- त्यादरम्यान शिवमची नोकरी नोएडामध्ये एका मोबाइल कंपनीच्या शोरूममध्ये लागली होती. आरोपीने ज्योतीवर ट्रान्सफर करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. तेव्हा तिनेही दिल्लीमध्ये लाजपतनगर येथील त्या ब्यूटी पार्लरच्या ब्रांचमध्ये ट्रान्सफर करून घेतले.
- जवळपास 8 महिन्यांपूर्वी ज्योती लुधियानामधून येथे राहायला आली होती. दोघीही तेव्हापासूनच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. ज्योती इंद्रपुरम येथील एका सलूनमध्ये काम करत होती. काही दिवसांपासून ती घरी उशिरा येत होती. यामुळे त्याला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला होता. 9 जून रोजीही ज्योती सलूनवरून घरी परतली होती. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. त्याने चिडून ज्योतीवर चाकूहल्ला केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात होता, तेवढ्यात लोकांची नजर त्याच्यावर गेली आणि तो पकडला गेला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...