आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट: मॉडलिंगच्या नावावर तरूणींना करायला लावायचे असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- गुना येथून दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणीला पोलिसांनी शोधून काढले आहे. तरूणीच्या शोधात पोलिस एका हाय प्रोफाइल रॅकेट पर्यंत पोहोचले. याच रॅकेटने तरूणीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून देहविक्रीच्या व्यावसायाद लोटले होते. बुधवारी दुपारी पोलिसांनी बुढेबालाजी परिसरातील एका घरावर दबा ठेऊन एका तरूणीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींनाल अटक केली आहे, त्यांच्याशी रॅकेटविषयी विचारपूस करण्यात येत आहे.


असे आहे प्रकरण...
शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी 31 जानेवारीला बजरंगगड बायपासवरील आपल्या घरातून अचानक गायब झाली. खुप वेळ शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने, कुटुंबीयांनी पोलिसांत ती हरवली असल्याची तक्रार दाखल केली. पोलिस तरूणीचा शोध घेत होते, तेव्हा नातेवाईकांनी सांगितले की, ती बूढेबालाजी परिसरातील एका घरात आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नजर ठेऊन कॉल डिटेल्स काढली तेव्हा ती 23 वर्षीय तिरखरशी बोलत असल्याचे पोलिसांना कळाले.


पोलिसांनी तिरखरशी विचारपूस केली, तेव्हा त्याने सांगितले की, तरूणीशी त्याची ओळख सोशल साइटवरून झाली होती. हळू हळू मैत्री झाली आणि नंतर तरूणाचे इतर मित्र देखील मुलीच्या संपर्कात आले. यानंतर पोलिसांनी त्याला मुलीला फोन करण्यास सांगितले. त्याने कॉल करताच मुलीने रिप्लाय केला. तिचे लोकेशन बूढेबालाजी येथील रशीत कुरैशी यांच्या घरी असल्याचे ट्रेस झाले.

लोकेशन मिळतात पोलिसांच्या टीमने कुरैशीच्या घरावर छापा मारला. येथून पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह दोन इतर तरूणी देखील मिळाल्या आहेत, त्यांची चौकशी करून पोलिसांनी त्याना पोलिस ठाण्यात नेले आहे. तसेच, पोलिस येण्याची माहिती मिळताच रशिद कुरैशी पत्नीला घेऊन फरार झाला.


अन्य महिला देखील झाल्या आहेत शिकार...
एसपी निमिष अग्रवाल यांनी सांगितले की, रॅकेटचे हे जाळे खूप लांब पर्यंत पसरलेले  आहे. चौकशीदरम्यान या रॅकेटच्या जाळ्यात आणखी काही तरूणी अडलकल्या असल्याचे समोर आले आहे. त्याचे असे ब्रेनवॉश करण्यात आले होते, की त्या पोलिसांपर्यंत पोहचून नये.  दोन डझनपेक्षा अधिक तरूणी या रॅकेटच्या जाळ्यात अडलेल्या असल्याची शक्यता आहे. फारार आरोपींचे काही प्रभावी व्यक्तींसोबत संबंध असल्याची देखील माहिती मिळाली आहे. प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.


पुढील स्लाइडवर वाचा, मॉडलिंगच्या नावावर तरूणींना फसवत होते, पती-पत्नी....

बातम्या आणखी आहेत...