आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मोठी बातमी: मुंबईत इमारतीला भीषण आग, 2 अग्निशमन अधिकारी किरकोळ जखमी Breaking News Fire At Building Fort Area Mumbai Latest News And Updates

मुंबईतील पटेल चेंबर्सची भीषण आग अखेर आटोक्यात; अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- फोर्ट परिसरातील पटेल चेंबर्सला शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेली भीषण आग तीन तासांच्याच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली आहे. आग अत्यंत भीषण होती. अग्निशमन दलाच्या 18 गाड्यांमधील पाण्याच्या मार्‍याने आग विझविण्यात जवानांना यश आले आहे. परंतु ही भीषण आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

 

हेही वाचा...PHOTO, VIDEO तून पाहा मुंबईतील पटेल चेंबर्सला लागलेली भीषण आग

 

सूत्रांनुसार, फोर्ट परिसरात असलेल्या पटेल चेंबर्सला पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग एवढी भीषण होती की, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे लागले. या अग्निकांडात इमारतीचा काही भाग कोसळल्याने अग्निशमन दलाचे 2 अधिकारी किरकोळ जखमी झाले.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इमारतीला लागलेल्या भीषण आगीचा व्हिडिओ..

बातम्या आणखी आहेत...