आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: बिहार 10वी बोर्डाच्या 42,400 उत्तरपत्रिका भंगारवाल्याकडे, चपराशानेच विकल्या साडे 8 हजारांत, निकाल बाकी Breaking News School Order Holder Had Sold Copies Of The Matriculation

10 वी बोर्डाच्या 42,400 उत्तरपत्रिका रद्दीवाल्याकडे सापडल्या, शिपायानेच केली साडे 8 हजारांत विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- 19 जून रोजी उत्तरपत्रिका गायब झाल्याचे प्रकरण समोर आले होते.

- चपराशाने फोनवरूनच केला होता उत्तरपत्रिकांचा सौदा.

 

गोपालगंज - बिहारमध्ये 10वी बोर्ड परीक्षेच्या गायब झालेल्या 42,400 उत्तरपत्रिका एका रद्दीवाल्याकडे आढळल्या आहेत. शाळेच्या चपराशानेच या उत्तरपत्रिका अवघ्या 8,500 रुपयांमध्ये भंगारवाल्याला विकल्या होत्या. पोलिसांनी भंगार व्यावसायिक पप्पू कुमार गुप्ता आणि त्याचा नोकर संतोष यांना अटक केली आहे. 10वी बोर्डाचा निकाल 20 जून रोजी येणार होता. परंतु उत्तरपत्रिका गायब झाल्यामुळे निकालाची तारीख टाळण्यात आली होती. आता 26 जून रोजी निकाल घोषित केले जाऊ शकतात. 

 

निकाल जाहीर होण्याच्या आधी 19 जून रोजी गोपालगंजच्या एस. एस. प्लस टू हायस्कूलमधून उत्तरपत्रिका गायब झाल्याचे प्रकरण समोर आले होते. प्रिसिंपल प्रमोद कुमार श्रीवास्तव यांनी चपरासी छठू सिंह आणि गार्डविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला होता. बिहार शिक्षण मंडळाने प्रिंसिपलला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. हलगर्जीपणाच्या आरोपावरून पोलिसांना त्यांना अटकही केली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. चौकशीत रद्दीवाल्याने सांगितले की, 17-18 दिवसांपूर्वी चपराशाने फोनवरून सौदा केला होता. फोन चपराशानेच केला होता. यानंतर ऑटोमध्ये कागदं टाकून त्याच्या दुकानात आणण्यात आले. 121 किलो वजनांच्या उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांची मोजणी अजूनही सुरूच आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos.. 

बातम्या आणखी आहेत...