आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ब्रेकिंग न्यूज: उत्तर प्रदेशात मैनपुरीमध्ये डबल डेकर बस उलटून 16 जण ठार Breaking News Uttar Pradesh Mainpuri Bus Accident News And Updates

उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये भीषण अपघात, 17 ठार, 20 जखमी; 50 मीटर घासत गेली बस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैनपुरी - जयपूरहून गुरसायगंजला जात असलेल्या स्लीपर कोचची खासगी बस दन्नाहारच्या किरतपुर चौकाजवळ उलटली. यात 17 जण ठार झाले असून 20 जखमी झाले आहेत. यातील 3 जणांची प्रकृती नाजूक आहे. अपघात पहाटे 5 वाजता झाल्याचे कळते. सूत्रांनुसार, ड्राइव्हरला झोप लागल्यामुळे बस दुभाजकाला धडकून उलटली. 

 

मैनपुरी-इटावा रोडवर झाला अपघात
- पोलिसांच्या मते, हा अपघात मैनपुरी-इटावा रोडवर झाला. जखमी झालेल्या प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी 3 जणांना सैफई मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आले आहे.  

- वृत्तसंस्थेनुसार, या बसमध्ये 60 ते 70 प्रवासी स्वार होते. 

 

बसची दुभाजकाला धडक
- प्रवाशांच्या मते, अपघाताच्या आधी काही वेळापूर्वी बस उसळली आणि दुभाजकाला धडकून उलटली. प्रवाशांचा दावा आहे की, बस ड्रायव्हरला झोप अनावर झाल्यामुळे हा अपघात झाला.  

 

बातम्या आणखी आहेत...