आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breaking Uttarakhand 10 People Died 9 Injured When A Bus Skidded Off Into A Deep Gorge

भीषण दुर्घटना: 820 फूट खोल दरीत कोसळली बस, 14 ठार, 18 जण जखमी, हरिद्वारला जात होते प्रवासी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड - उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात प्रवाशांना घेऊन जात असलेली बस रस्त्यावरून घसरून 820 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत बसमधील स्वार 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले. पैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग एनएच 94 वर हा अपघात झाला. येथे उत्तराखंड परिवहनची प्रवासी बस सूर्यधारजवळ दुर्घटनाग्रस्त झाली. ही बस भटवाडी उत्तरकाशीहून हरिद्वारला जात होते. बसमध्ये 30 हून जास्त प्रवासी होते.

 

उत्तराखंड सरकारने अपघातातील मृत्युमुखींच्या नातेवाइकांना 2-2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. दुसरीकडे, जखमींना 50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. सोबतच अपघातात मॅजिस्ट्रेट चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यँत 14 जण ठार झाले असून 18 जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना बसमधून काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने चंबा जिल्ह्यातील CHC रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos.. 

 

 

बातम्या आणखी आहेत...