आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवाने केली अशी मागणी की नवरीने हार फेकला, म्हणाली-अविवाहित राहील पण याच्याशी लग्न नको

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - शेतकरी कुटुंबातील असलेल्या निभा कुमारी हिने एक असा निर्णय घेतला, जो कदाचित दुसरी मुलगी घेऊ शकली नसती. निभा कुमारी मधुबनी जिल्ह्यातील खुटौना प्रखंड येथील राहणारी आहे. तिने दारुच्या विरोधात असे पाऊल उचलले की, तिचे आयुष्यच बदलले. तिचे लग्न रंजीत कुमार कामत बरोबर ठरले होते. घरात आनंदाचे वातावरण होते. वऱ्हाड मंडपापर्यंत आले. सगळे आनंदाने नाचत होते. पण वरातीत बहुतांश सगळेच मद्यधुंद अवस्थेत होते. नवरदेव रंजीतही प्यायला होता. निभा हे पाहून नाराज झाला. पण रंजीतने मांडवात आल्यानंतरही एका बीअरची मागणी केली. निभाला हे समजले आणि तिने लग्नालाच नकार दिला. 


दारुड्याशी लग्न नको 
निभाचे वडीलही म्हणाले की, दारुड्याशी लग्न करण्यापेक्षा ती अविवाहित राहिलेले बरे. नवरीने लगेचच गळ्यातील हार काढून फेकला. सर्वांनाच धक्का बसला. लोकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने लग्नाला नकार दिला. 


सुधाकरने घातली मागणी  
निभाच्या या धाडसी पावलाचे सर्वच महिला आणि मुलींनी कौतुक केले. कोणीतही याविरोधात आवाज उठवला याचा त्यांना आंद होता. संपूर्ण परिसरात निभाच्या या धाडसाची चर्चा होती. या धाडसामुळे सुदाकर कामतने निभाला मागणी घातली आणि नंतर त्यांचे लग्न ठरले. 

बातम्या आणखी आहेत...