आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 5 दिवसांनी नववधूने पतीला केले बेशुद्ध, घरातले छतावर झोपायला जाताच केला असा गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना - येथील न्यू सुंदरनगरमध्ये लग्नाच्या 5 व्या दिवशी नवरदेवाला बेशुद्ध करून नवरी घरातील रोख रक्कम, दागिने आणि इतर महागड्या वस्तू घेऊन पळून गेली. या घटनेवेळी घरातील सदस्य छतावर झोपलेले होते. सकाळी नवरदेव बेशुद्ध आढळला, तर नववधू गायब होती.

 

असे आहे प्रकरण

नवरदेवाचा लहान भाऊ शरणजित सिंह म्हणाला, कुलदीपचे लग्न 29 जून रोजी अमृतसरच्या चाटी गावातील रमनदीप कौरशी झाले होते.

3 जुलै रात्री तो त्याच्या मामाचा मुलगा व वडिलांसोबत घराच्या छतावर झोपायला गेला. सकाळी उठून पाहिल्यावर मेनगेटचे कुलूप काढलेले होते. रूममध्ये पाहिल्यावर कुलदीप बेशुद्धावस्थेत आढळला अन् रमनदीप कौर गायब होती.

 

नवऱ्याला पाजले लिंबू पाणी, पडला बेशुद्ध 

शुद्धीवर येताच कुलदीप म्हणाला, ‘रमणदीपने जेवणानंतर त्याला लिंबू पाणी दिले होते. ते प्यायल्यानंतर त्याला चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला.’ पोलिस चौकशीत कळले की, घरातून 16 हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने व महागड्या वस्तू गायब झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...