आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाला न येणा-यास हातपाय बांधून आणा व भाजपला मत द्यायला लावा : येदियुरप्पा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी शनिवारी वादग्रस्त वक्तव्य केले. कित्तूर येथील पक्षाचे उमेदवार महंतेश डोड्डागौडर यांच्या प्रचारसभेत येदियुरप्पा कार्यकर्त्यांना म्हणाले, ‘एखादी व्यक्ती मतदानासाठी येणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या घरी जा.  त्याचे हातपाय बांधून आणा आणि महंतेश यांना मतदान करण्यास भाग पाडा. विजय निश्चित होईपर्यंत आरामाने बसू नका.’ 


काँग्रेसने येड्डींच्या या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला एका ट्विटमध्ये म्हणाले, ‘येदियुरप्पा हे लोकशाहीचा अपमान करत आहेत. मात्र मतदार भाजपला पराभूत करून धडा शिकवतील.’ कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.  येथे १२ मे रोजी मतदान आणि १५ मे रोजी निकाल लागेल.

बातम्या आणखी आहेत...