आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या नावापुढे \'श्री\' न लावल्याने दंड; BSF जवानाचा कापला 7 दिवसांचा पगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) पुन्हा एकदा चर्चेत आहे. संजीव कुमार नावाच्या जवानाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावापुढे "माननीय" किंवा "श्री" न लिहिल्याने त्याला शिक्षा देण्यात आली आहे.  

> मीडिया रिपोर्टनुसार, बीएसएफने पीएम यांचा 'अनादर' झाल्याचे सांगत जवानाचा 7 दिवसांचा पगार कापण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, कॉन्स्टेबल संजीव कुमारने मागच्या 21 फेब्रुवारी रोजी झीरो परेडला मोदी प्रोग्राम म्हणून संबोधित केले. झीरो परेड बीएसएफच्या सर्व युनिटमध्ये सकाळी होते आणि यात सर्व युनिटचे जवान हजर होऊन आपली उपस्थिती दर्शवतात.

> संजीव कुमार पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात तैनात आहेत. त्यांना बीएसएफ अॅक्ट 1968च्या सेक्शन 40 नुसार दोषी ठरवण्यात आले आहे.
> बीएसएफच्या ऑर्डरमध्ये लिहिण्यात आले आहे की, '21 फेब्रुवारी रोजी झीरो परेडदरम्यान रिपोर्ट देताना तुम्ही 'मोदी प्रोग्राम' अशा शब्दाचा प्रयोग केला जो माननीय पंतप्रधानांबद्दल अनादर करणारा आहे.' ऑर्डरनुसार संजीव कुमार यांचा सात दिवसांचा पगार दंड म्हणून जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...