आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या दौऱ्याआधी पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, 4 दिवसांत 2 जवान शहीद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीदा सीताराम यांची पत्नी म्हणाली, नुकसान भरपाईने पती परत येणार नाही. - Divya Marathi
शहीदा सीताराम यांची पत्नी म्हणाली, नुकसान भरपाईने पती परत येणार नाही.

श्रीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या एक दिवसआधी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. जम्मूच्या आरएस सेक्टर आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गुरुवारी उशिरा रात्री करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये बीएसएफ जवान सीताराम उपाध्याय (28) शहीद झाले. त्यासोबतच इतर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बीएसएफ अधिकाऱ्यासह 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. पंतप्रधान 19 मे रोजी जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहेत. 

 

पाकिस्तानकडून आधीही सीजफायरचे उल्लंघन 
- बीएसएफचे शहीद जवान सीताराम हे झारखंडमधील गिरिडीह येथील रहिवासी होते. 2011 मध्ये ते सीमा सुरक्षा बलमध्ये भरती झाले होते. त्यांना एक तीन वर्षांचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. 
- बीएसएफने  म्हटले आहे, की पाकिस्तानकडून 16 आणि 17 मे रोजी हीरानगर येथे फायरिंग करण्यात आली होती. यामध्ये बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता. पाकिस्तानने दिवसा गोळीबार थांबवला होता, मात्र गुरुवारी रात्री पुन्हा एकदा अरनिया सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. 

 

शहीदाची पत्नी म्हणाली- नुकसान भरपाईने पती परत येणार नाही 
- सीजफायरमध्ये शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीने म्हटले आहे, की माझे पतीन पाकिस्तानकडून झालेल्या फायरिंगमध्ये शहीद झाले आहे, नुकसान भरपाईने ते परत येणार नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...