आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बौद्ध पौर्णिमा: लुंबिनी पासून पेशावर-बामियान पर्यंत होता बौद्ध धर्माचा विस्तार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होतो. या तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. गौतम बुद्ध ज्या-ज्या ठिकाणी गेले ते सर्व ठिकाण बौद्ध तीर्थ बनले. बुद्धांनी काश्मीरपासून ते अफगाणिस्तानपर्यंत यात्रा केली होती. बौद्धकाळात अफगाणिस्तानने बामियान क्षेत्र बौद्ध धर्माची राजधानी होते. मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रारंभिक काळात बौद्ध धर्माचे गड होते. बुद्ध पौर्णिमे निमित्ताने आज आम्ही तुम्हाला बुद्धाच्या अशाच 10 ठिकाणांची माहिती देत आहोत.

 

लुंबिनी 
गौतम बुद्धांचा जन्म इ.स. 563 पूर्वी नेपाळच्या लुम्बिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला. उत्तर प्रदेशातील ककराहा नामक गावापासून 14 किलोमीटरवर नेपाळ-भारताच्या सीमेवर असलेल्या रुमीनोदेई नावाचे गाव लुम्बिनी असून हे गौतम बुद्धांच्या जन्मस्थान रूपात प्रसिद्ध आहे. कपिलवस्तूमध्ये एक स्तूप होते, जेथे भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. बुद्धांची आई कपिलवस्तूची महाराणी मायादेवी आपल्या माहेरी कोलीय गणराज्याची राजधानी देवदह येथे निघाल्या होत्या तेव्हा रस्त्यामध्ये त्यांनी लुम्बिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली बुद्धांना जन्म दिला होता.

बातम्या आणखी आहेत...