आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आई बहिणींवर चुलत्याची होती वाईट नजर, पुतण्याने कात्रीने भोसकून केली निर्घृण हत्या Businessman Murder Case Nephew Was Accused

आई-बहिणींवर चुलत्याची होती वाईट नजर, पुतण्याने कात्रीने भोसकून केली निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - येथील छित्तूपूर परिसरात बिस्किट व्यापाऱ्याच्या हत्येचे गूढ पोलिसांनी 24 तासांतच उलगडले आहे. मृत नरेंद्र जायसवालचा पुतण्या शुभमनेच हत्या केल्याचे आढळले. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी शुभमच्या मते, चुलता त्याच्या कुटुंबीयांना घाणेरड्या शिव्या द्यायचा. 

 

आई-बहिणीवर होती वाईट नजर..
- मीडियासमोर आरोपी शुभम म्हणाला की, त्याचा सख्खा काका त्याच्या आईबहिणीवर वाईट नजर ठेवायचा. त्यांना त्रास द्यायचा. चुलता नेहमी विजेचे कनेक्शनही कट करायचा.
- मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरात वीज नव्हती. यावरून दररोज घरात कुरबुरी होत होत्या.
- 'त्या दिवशीही काकाने घरच्यांना खूप त्रास दिला. रात्री विजेचे कनेक्शन कट केले. वडिलांनी त्याच्या पाया पडून भीक मागितली, तरीही तो ऐकला नाही.' 
- 'यानंतर रात्रीच्या वेळी संधी पाहून मी काकाला कैचीने भोसकले आणि तिथून पळून गेलो.'

 

असे पकडले पोलिसांनी
- यादरम्यान पोलिसांना या हत्येप्रकरणी शुभमचा संशय आला, त्यांनी त्याचा शोध सुरू केला.
- आरोपी शुभम सिगरा येथील श्रीराम कॉम्‍प्लेक्‍सच्या जवळ टॅक्‍सी स्टँडवर उभा असून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेवढ्यात पोलिसांनी त्याला तेथे जाऊन अटक केली.
- घटनेनंतर शुभम दिल्लीला पळून जाणार होता. येथून तो इलाहाबादला गेला होता, परंतु रेल्वे सुटल्यामुळे परत वाराणसीला आला.
- यासोबतच हत्येसाठी वापरलेली कैचीही पोलिसांनी जप्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...