आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडाच्या पंतप्रधानांनी कुटुंबासह सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन, लंगरमध्ये पोळ्या लाटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी बुधवारी सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. ट्रूडो यांनी संपूर्ण कुटुंबासह गुरु ग्रंथ साहेब यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी लंगर हॉलमध्ये भक्तांसाठी पोळ्याही लाटल्या. ट्रूडो यांच्यासह त्यांची पत्नी सोफी ग्रेगोयर ट्रूडो आणि मुले पारंपरिक पंजाबी पोषाखात होते. जवळपास एक तास ते सुवर्ण मंदिरात होते. ट्रूडो एक आठवड्याच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. बुधवारी त्यांच्या दौऱ्याचा पाचवा दिवस होता. 23 फेब्रुवारीला ते पंतप्रधान नरेंद्र  मोदींची भेट घेणार आहेत. 

 

केंद्रीय मंत्री पुरींनी केले स्वागत
- जस्टिन ट्रूडो, त्यांची पत्नी आणि मुले कॅनडाच्या शिष्टमंडळासह बुधवारी सकाळी श्री गुरु रामदास इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचले. येथे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि पंजाबचे पर्यटन मंत्री नवजोतसिंह सिद्धू यांनी त्यांचे स्वागत केले. 
- विमानतळावरुन ते थेट सुवर्ण मंदिरात पोहोचले. त्यांनी मंदिराची परिक्रमा केली. 
- शिरोमणी गुरुद्वारा प्रबंध कमिटीने त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले होते. 
- ट्रूडो यांनी येथे भक्तांना हात जोडून अभिवादन केले. 
- ट्रूडो यांच्यासह त्यांच्या परिवाराला मंदिरात सिरोपा भेट देण्यात आला. हा एक प्रकारचा कपडा आहे. पाहुण्यांच्या सन्मानात सिरोपा डोक्यावर बांधला जातो.   

 

सुरक्षेचा चोख बंदोबस्त 
- ट्रूडो पंजाब दौऱ्यावर येणार असल्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या मार्गात 1500 जवान तैनात होते. 

बातम्या आणखी आहेत...