आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी-बिहार पोटनिवडणूक : भाजपचे उमेदवार जाहीर, गोरखपूरमधून उपेंद्र शुक्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूर मधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. अररिया मधून प्रदीप सिंह यांचे नाव अंतिम केले आहे. याशिवाय बिहारच्या भभुआ आणि जहानाबाद विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. भभूआमधून रिंकी पांडे यांना उमेदवारी मिळाली आहे तर जहानाबाद मतदारसंघातून उमेदवाराची निवड अद्याप झालेली नाही. युपीतील लोकसभेच्या जागांसाठी समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने आधीच आपल्या उमेदवारांची नावे अंतिम केली आहेत. पोडनिवडणुकीसाठी 11 मार्चला मतदान होणार आहेत निकाल 14 तारेखला घोषित होतील. 


# लोकसभा पोटनिवडणूक
1. गोरखपूर
: योगी आदित्यनाथ येथून पाच वेळा खासदार झाले आहेत. ते 21 सप्टेंबर 2017 ला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाली होती. 
2. फुलपबर : केशव प्रसाद मौर्य इथले खासदार होते. ते यूपीचे उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांची खासदारकीची जागा रिक्त झाली.  
3. अररिया : आरजेडीचे खासदार तस्लीमुद्दीन यांचे 17 सप्टेंबर 2017 रोजी निधन झाले त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. 


# विधानसभा (बिहार)
1. भभूआ :
भाजप आमदार विनायक आनंद भुषण पांडेय यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. 
2.जहानाबाद : या मतदासंघाचे आमदार मुद्रिका सिंग यांचं निधन झाले.


कोण आहेत उपेंद्रदत्त शुक्ला ?
बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष उपेंद्र दत्त शुक्ला हे खूप वर्षांपासून पार्टी आणि जनतेमध्ये सक्रिय आहेत. त्यांची केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याशी जवळीक असल्याचे बोलले जाते. त्यांनी कवडीराम विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढविली आहे. शुक्ला यांनी 2007 मध्ये पक्षाच्या विरोधात बंड करुन निवडणूक लढविली होती, यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 


संघाच्या जवळचे आहेत कौशल सिंग 
फुलपूर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार कौशलेंद्र सिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. ते 2006-2012 या काळात वाराणसीचे महापौर होते. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. 


सपा-काँग्रेसने आधीच केली उमेदवारांची घोषणा
समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. सपाने गोरखपूरमध्ये निषाद पार्टी आणि पीस पार्टी सोबत युती केली आहे. येथे निषाद पार्टीचे इंजिनियर प्रवीणकुमार निषाद-सपाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. तसेच फुलपूर येथून सपाचे नागेंद्र प्रतापसिंग पटेल हे उमेदवार असतील. काँग्रेस ने गोरखपूरमधून डॉ. सुरहिता करीम आणि फुलपूरमधून मनीष मिश्रा यांना निवडणूकीच्या मैदानात उतरविले आहे. 

बातम्या आणखी आहेत...